Mahadayi water dispute in Goa  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: ‘म्हादई’साठी आजचा दिवस ठरणार महत्त्वाचा

Goa: गोव्याचे राज्य शिष्टमंडळ केंद्राला भेटण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादईबाबत केंद्रीय जल लवादाने कर्नाटकला मंजुरी दिल्याने राज्यातील जनतेत संताप निर्माण झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गुरुवारी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाचे एक शिष्टमंडळ दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे म्हादई प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 5 जानेवारी रोजी सुनावणी ठेवली आहे. हा मुद्दा देखील पटलावर येईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे म्हादईसंदर्भात उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.

कर्नाटकच्या म्हादईवरील कळसा, भांडुरा उपनद्यांचे पाणी वळवण्याच्या सुधारित प्रकल्पाच्या आराखड्याला जल आयोगाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. असे असतानाही सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीसह काही पक्षांनी केवळ घोषणाबाजीवर भर दिल्याचे दिसत आहे.

याला अपवाद तृणमूल काँग्रेसने आज आझाद मैदानावर केंद्राने निर्णय मागे घ्यावा, याकरिता निदर्शने केली. तत्पूर्वी सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा फ्रंट या संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 16 जानेवारीपर्यंत याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तर आपने शिष्टमंडळासह मंगळवारी कणकुंबी येथे म्हादई नदीपात्राची पाहणी केली. दरम्यान, म्हादईसाठी गोमंतकीयांनी एकसंघ होण्याची वेळ आली आहे. मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आवश्‍यकता आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कर्नाटक सरकारने म्हादईच्या पात्रांमध्ये केलेल्या अवैध कामांच्या पाहणीसाठी जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे. कर्नाटकला दिलेली मान्यता मागे घ्यावी, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला करणार आहोत,

अशी प्रतिक्रिया जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. याकरिता ते गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय जलस्रोतमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेऊन त्यांच्याशी म्हादई प्रश्‍नाविषयी चर्चा करणार आहेत..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT