Basavaraj Bommai Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: बोम्मईंचा आडमुठेपणा, म्हणाले म्हादईचा प्रकल्प सुरू करणारच, गोव्याचा आम्हाला फरक पडत नाही

लवादाच्या निवाड्याप्रमाणेच आम्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: म्हादई नदीचे पाणी वळवण्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत कर्नाटकला केंद्र सरकारने डीपीआर मंजुरी दिल्यामुळे गोव्यात आणखी खळबळ निर्माण झाली असून अधिवेशनामध्येही या मुद्द्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये 'आमची म्हादय आमका जाय' असा नारा करत गोवेकर रस्त्यावर उतरले आहेत. मात्र याच दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आडमुठेपणा घेत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, आम्हाला केंद्र सरकारकडून डीपीआर मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही आता लवकरच म्हादई प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत. याबाबत गोव्याने कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला कोणताच फरक पडणार नसून लवादाच्या निवाड्याप्रमाणेच आम्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

आधीच म्हादईवरून तापलेल्या राजकारणात आता गोव्यातील सरकारची आणि विरोधकांची यावर काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT