Mahadayi Water Dispute Discussion in Assembly Session  Dainik Gomantak
गोवा

Mahaday Water Dispute: म्हादईचा प्रश्न आज दिल्ली दरबारी मांडणार

म्हादई प्रश्नासंदर्भात गोव्याचे शिष्टमंडळ आज गृहमंत्री शहांची भेट घेणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mahaday Water Dispute: कळसा आणि भांडुरा या म्हादईच्या उपनद्यांचे पाणी वळविण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) दिलेल्या मंजुरीनंतर गोव्यात जनप्रक्षोभ उसळला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचे ठरवले असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शहा यांची भेट घेणार आहे.

त्यावेळी कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजुरी मागे घ्यावी आणि तातडीने जल व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी करणार आहे.

विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पर्यावरणवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. ‘आरजी’च्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर आता 16 जानेवारीला साखळीमध्ये भव्य जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

डीपीआर मागे घ्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून जल व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करावी आणि कर्नाटकच्या डीपीआरला दिलेली मंजुरी मागे घ्यावी, याकरता आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे.

यात सभापती रमेश तवडकर, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल, वनमंत्री विश्वजीत राणे, ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT