Goa to Kumbh Mela Train
पणजी: उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याची संधी गोवेकरांना मिळणार आहे. अधिकाधिक लोकांना या महाकुंभमेळ्यात सहभागी होता यावे म्हणून गोवा राज्य सरकारची स्वतंत्र रेल्वे व्यवस्था सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार हा रेल्वे प्रवास मोफत दिला जाणार नाही.
१३ जानेवारीपासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु झाला आहे आणि हा उत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या महाकुंभ मेळ्याला देश-विदेशातून लाखो आणि करोडो भाविक तसेच पर्यटकांनी उपस्थिती लावलीये आणि आता गोवेकरांसाठी देखील महाकुंभमध्ये सभागी होण्याची सर्वोत्तम संधी उपलब्ध होईल.
महाकुंभ मेळ्याचे हिंदू धर्मात भरपूर महत्व आहे, आणि म्हणून या उत्सवाला सहभागी होणं हे गोवेकरांसाठी देखील महत्वाचं ठरतं. प्रयागराजला गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन महत्वाच्या नद्यांचा संगम होतो.
गोमंतकीय जनतेला देखील या महाकुंभात सहभागी होता यावं म्हणून राज्य सरकारची उपाययोजना सुरु आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची रेल्वे प्रशासनासोबत चर्चा सुरु आहे, मात्र गोवा ते उत्तर प्रदेश होणारा हा रेल्वे प्रवास मोफत असणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याचे आमंत्रण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मंत्री दारासिंग चौहान व राज्यमंत्री रामकेश निषद यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन कुंभमेळ्याची आमंत्रण पत्रिका सूपूर्द केली होती.उत्तर प्रदेशचे मंत्री दारासिंग चौहान व राज्यमंत्री रामकेश निषद यांनी आल्तिन पणजी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कुंभमेळ्याचे आमंत्रण दिले. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या काळात त्रिवेणी संगम प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याला हजर राहण्याची विनंती यावेळी मंत्र्यांनी सावंत यांना करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.