Madhya Pradesh Assembly Election 2023 Indore Goa CM Pramod Sawant  
गोवा

ख्रिश्चन लोक गोव्यातून परदेशात स्थलांतर का करतायेत? प्रश्नावर CM सावंतांनी इंदूरमध्ये काय दिले उत्तर

मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील शिवराज सरकारच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे.

Pramod Yadav

Madhya Pradesh Assembly Election 2023 Goa CM Pramod Sawant: भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावत सध्या मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आहेत.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. गोव्यातील ख्रिश्चन समुदायाची संख्या कमी होत असून, या समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला.

ख्रिश्चन लोकांना स्थलांतर करण्याची गरज नाही. या समाजाचे लोक चांगल्या नोकरीच्या उद्देशाने परदेशात जात आहेत. तसेच, अनेक लोकांकडे पोर्तुगीज नागरिकत्व आहे. असे उत्तर मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

इंदूर येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनआशीर्वाद यात्रा आणि मध्य प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्री सावंत यांना यावेळी विरोधकांच्या इंडिया युतीबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला.

'सनातन धर्म नष्ट करण्यासाठी ही युती करण्यात आली आहे. सनातन धर्माबाबत नेते ज्या प्रकारे अपमानास्पद शब्द वापरत आहेत, त्यावरून या आघाडीचे धोरण आणि हेतू दिसून येतो. इंग्रज, मुघल आणि पोर्तुगीजांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.मध्य प्रदेशातील नागरिकांसाठी या युतीचा काहीही अर्थ नाही.' असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

'गोवा राज्य 1961 पासून समान नागरी संहितेचे पालन करत आहे याचा मला आनंद आहे. इतर राज्ये आता याबाबत नियम बनवत आहेत. समान नागरी संहितेच्या दृष्टीने गोवा हे इतर राज्यांसाठी आदर्श आहे.' असे मुख्यमंत्री सावंत समान नागरी संहितेच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, काँग्रेसने मध्य प्रदेशात दीड वर्ष सरकार चालवले, पण जनता काँग्रेसला दुसरी संधी देईल, असे कोणतेही काम पक्षाने केलेले नाही. भाजप सरकारच्या योजना जनतेला आवडत आहेत, त्यामुळे मध्य प्रदेशात पुन्हा डबल इंजिन सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील शिवराज सरकारच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि काका खूप चांगले काम करत आहेत. येथेही विशेषत: अंत्योदय घटकावर काम सुरू आहे. अंत्योदय घटकांवर काम करणारे भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिन सरकार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT