Madgaon Dainik Gomantak
गोवा

Madgaon: कोंब प्रभागात विकासकामांना वेग

कोंब मडगाव पालिकेच्या प्रभाग 12चे प्रतिनिधित्व करत असून सुमारे 20 लाख रुपये खर्चून या प्रभागातील गटार व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला आहे.

दैनिक गोमन्तक

madgaon: स्वामी विवेकानंदांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले श्री दामबाब साल, 100 वर्षांपेक्षा अधिक इतिहास असलेले गोमंत विद्या निकेतन यासारखी सांस्कृतिक संस्था, श्री विठ्ठल मंदिर अशा वास्तूंचा सामावेश असल्याने मडगाव येथील एक महत्त्वाचा वाडा ठरलेल्या कोंब प्रभागात सध्या 50 लाखांची विकासकामे सुरू करण्यात आली असून त्यात विद्या निकेतन परिसराचे सौंदर्यीकरण हे महत्त्वाचे काम ठरणार आहे.

स्थानिक नगरसेवक दादा (सगुण) नायक यांनी पाठपुरावा करून या कामांना चालना दिली असून त्यात विद्या निकेतनच्या सौंदर्यीकरण कामावर २० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

त्यात या वास्तूच्या कुंपणाला टाईल्स बसविण्याबरोबर वरचे रेलिंग एका सांस्कृतिक संस्थेला शोभा आणणारे असेल, अशी माहिती नायक यांनी दिली. हल्लीच या कामाची स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी सुरुवात केली होती.

मडगाव पालिकेच्या प्रभाग 12चे प्रतिनिधित्व करत असून सुमारे 20 लाख रुपये खर्चून या प्रभागातील गटार व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला आहे. कोंब येथे काही अशा जागा आहेत तिथे गटार व्यवस्था कोलमडून पडली होती.

हे काम हातात घेतले असून पावसात पाणी कुठेही साचून राहू नये यासाठी काही महत्वाच्या ठिकाणी क्रॉस ड्रेन्स बांधण्याचे कामही चालू असल्याचे नायक यांनी सांगितले.

कोंब भागातील काही घरे सखल भागात असल्याने ती सांडपाणी वाहिनीला जोडता येत नव्हती. त्यामुळे त्यांचे सांडपाणी कित्येकदा भरून रस्त्यावर वाहून लोकांना त्रास सहन करावा लागत होता. ही घरेही सांडपाणी वाहिनीला जोडण्यासाठी पाटबंधारे खात्यातर्फे लवकरच नवीन जागेत चेंबर्स बांधण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. - दादा (सगुण) नायक, नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT