Konkan Railway Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मडगावात 514.5 किलो गोमांस जप्त; कोकण रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई, एकाला अटक

Konkan Railway Police: कोकण रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मडगाव रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयातून सुमारे ५१४.५ किलो गोमांस जप्त केलं आहे.

Sameer Amunekar

Konkan Railway Police Seized 514.5kgs of suspected Bovine meat

मडगाव: कोकण रेल्वे पोलिसांनी मोठी कारवाई करत मडगाव रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयातून सुमारे ५१४.५ किलो गोमांस जप्त केलं आहे. या गोमांसाची अंदाजे किंमत १ लाख ५४ हजार ३५० रूपये असून, हे गोमांस बेकायदेशीरपणे वाहतूक केलं जात होतं.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे गोमांस दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकातून पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणी फयाज अहमद मोहम्मद हनीफ केंगेनावर (वय ३७) याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्यावर गोवा प्राणी संरक्षण कायदा आणि रेल्वे कायद्याच्या तरतुदींचं उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक आणि कोकण रेल्वेचे पोलीस उपअधीक्षक यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक सुनील गुडलर, पीएसआय रुझवेल्ट फर्नांडिस, पीसी शेख इर्शाद, पीसी मोहम्मद हुसेन यांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कोकण रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. गोवा प्राणी संरक्षण कायद्याच्या कठोर तरतुदींनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. तसंच, या मांस वाहतुकीच्या नेटवर्कचा तपास करून अन्य कोण या प्रकरणात सामील आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT