Ghanshyam Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Madgaon Mayor Resigns : मडगावात घनःश्‍यामची माघार; तरीही भाजपची डोकेदुखी कायम

दिगंबर कामत यांच्या मडगाव मॉडेलच्या दामोदर शिरोडकर यांच्या बरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक आणि कामील बार्रेटो यांनीही नगराध्यक्षपदावर दावा सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Madgaon Mayor Resigns : मडगावचे नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकर यांनी अविश्‍वास ठराव मतदानापूर्वीच काल राजीनामा दिला. मात्र, दिगंबर कामत यांच्या मडगाव मॉडेलच्या दामोदर शिरोडकर यांच्या बरोबर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक आणि कामील बार्रेटो यांनीही नगराध्यक्षपदावर दावा सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी कायम असल्याचे दिसत आहे.

अविश्‍वास ठरावावर चर्चा करून नंतर मतदानासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता बैठक बोलावली होती. यावेळी हात दाखवून उघडपणे मतदान होणार होते. त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नगरसेवकाने घनःश्‍याम यांच्या बाजुने मतदान केले नसते. संख्याबळाचे गणित जुळत नसल्याने त्यांनी बैठकीच्या पूर्वसंध्येलाच राजीनामा नगरपालिका प्रशासन संचालकांकडे पाठवला. मागच्या निवडणुकीत भाजप नगरसेवकांनी क्रॉस मतदान केल्याने यापुढे हात दाखवून उघडपणे निर्णय घेण्यास निर्वाचन अधिकारी सांगतील, अशी व्युवरचना करण्यात आली आहे.

हे मतदान कसे असावे? याचा निर्णय निर्वाचन अधिकारी घेऊ शकतात, असा दावा कामत गट आणि भाजप करत आहे.

शुक्रवारी जर गुप्त पद्धतीने मतदान झाले असते, तर मला 20 मते पडली असती. गत निवडणुकीत पाच जणांनी माझ्या बाजूने मतदान केले, म्हणून त्यांना देवासमोर नारळावर प्रमाणित करण्यात आले. मला पुन्हा माझ्या साथी नगरसेवकांना धर्म संकटात टाकायचे नव्हते. त्यामुळेच मी राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया मावळते नगराध्यक्ष घनःश्‍याम शिरोडकर यांनी दिली आहे.

बैठक होणारच

नगराध्यक्ष शिरोडकर यांनी राजीनामा दिला असला तरी शुक्रवारी सकाळी 11 वाजता ठरल्याप्रमाणे बैठक होणार आहे. यावेळी अविश्‍वास ठरावावर मतदान होईल. राजीनामा दिला असला तरी तो सात दिवसांच्या आत परत घेण्यास घनःश्‍याम यांना मुभा असते. त्यामुळे हा ठराव संमत करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT