Parra  Student
Parra Student  Dainik Gomantak
गोवा

Parra News : म्हादईतीरी पक्षी वैविध्याचे दर्शन; गांजेत ‘खग चेतन पक्षी निरीक्षण’ उपक्रम

गोमन्तक डिजिटल टीम

Parra News :

पर्ये, केरी-सत्तरी येथील उत्साही पक्षी निरीक्षक आणि विवेकानंद पर्यावरण फौजचे संस्थापक सदस्य नारायण पारोडकर यांच्या स्मरणार्थ आंबेशी-पाळी, गांजे येथे म्हादईतीरी ‘खग चेतन पक्षी निरीक्षण’ उपक्रम आयोजित केला होता. यावेळी या भागातील पक्ष्यांच्या वैविध्याचे दर्शन झाले.

यावेळी विवेकानंद पर्यावरण फौजचे सदस्य तसेच सरकारी प्राथमिक विद्यालय आंबेशी- पाळीचे इयत्ता तिसरी व चौथीचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप वेरेकर, माजी अध्यक्ष अशोक पिळयेकर, माजी अध्यक्ष अनिल आंबेशकर, शिक्षक यतीश वेरेकर, प्रभारी मुख्याध्यापिका स्वाती महाले, भिवा गावकर, विवेक पारोडकर आदी उपस्थित होते. स्वागत विठ्ठल शेळके यांनी केले, तर दीपक गावस, स्वाती महाले यांनी आभार मानले.

या उपक्रमात पक्षी अभ्यासक मृगया एक्सपेडिशनचे गजानन शेटये यांनी मोठ्या दुर्बिणीतून पक्ष्यांचे दर्शन घडविले आणि पक्ष्यांविषयी सविस्तर माहिती दिली.

मुलांनी पाहिले हे पक्षी :

जंगल सातभाई, दयाळ, पांढऱ्या भुवईचा धोबी, धूसर कडा पंकोळी, तारवाली भिंगरी, लाल बुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, लाल पुठ्ठ्याची भिंगरी, तपकिरी डोक्याचा कुटुरगा, तांबट, टोई पोपट, टकाचोर, पारवा, कोकिळा,

ठिपकेदार होला, हळद्या, बुरखाधारी हळद्या, राखी कोतवाल, टिकेलची निळी माशीमार, शिंपी, जांभळी पुठ्ठ्याचा शिंजीर, जांभळा शिंजीर, वेडा राघू, भारतीय पाणकावळा, टिटवी, कवड्या धीवर, पांढऱ्या छातीचा धीवर, सामान्य धीवर, गाय बगळा, समुद्री घार, शिक्रा, ढोकरी, भारतीय राखी धनेश, मलाबार ग्रे धनेश अशा ४० पेक्षा जास्त पक्ष्यांचे दर्शन झाले.

ई-बर्डस हॉटस्पॉट असलेला हा म्हादईकाठचा आंबेशी-गांजे पूल परिसर पक्षी अभ्यासकांसाठी मोठी पर्वणीच असते. हजारोंच्या संख्येने देश-विदेशातून पक्षी अभ्यासक या पुलावर येतात. आम्ही दरवर्षी ‘खग चेतन बर्ड वॉक’ आयोजित करतो.

- संकेत नाईक, विवेकानंद पर्यावरण फौज.

४० प्रकारचे पक्षी

या पक्षी निरीक्षणावेळी जमिनीवर खाद्य शोधणारे, हवेत खाद्य मिळविणारे, वृक्ष निवासी, पाणथळावरील, शिकारी आदी सुमारे ४० विविध पक्ष्यांचे दर्शन पक्षीप्रेमींना झाले. यावेळी पश्चिम घाटातील स्थानिकांमध्ये समाविष्ट असलेले ''मलबार  ग्रे हॉर्नबिल'' आणि ''ग्रे फ्रँटेड ग्रीन पिजन'' आदी आकर्षक पक्षी पाहायला मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Muder Case: दारूची अर्धी बाटली ठरली तरुणाच्या खूनाचे कारण; मद्यधुंद मित्रानेच काढला काटा

Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Budget 2024: पीएम किसानच्या हप्त्यात होणार वाढ? कृषी तज्ञांनी अर्थमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

SCROLL FOR NEXT