Pub House In Goa Dainik Gomantak
गोवा

Pub House: एम. के. पब हाऊस कायमचे बंद करा; प्रस्ताव दाखल

Pub House: वेश्‍या व्यवसायप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी सील केलेले रायबंदर येथील एम. के. पब हाऊस कायमचे बंद करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला असून त्यावरील निर्णय प्रलंबित आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: वेश्‍या व्यवसायप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी सील केलेले रायबंदर येथील एम. के. पब हाऊस कायमचे बंद करण्यासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला असून त्यावरील निर्णय प्रलंबित आहे. हा डान्स बार तसेच व्यवसायासाठी संशयित महेश हेगडे याने व्यापार परवाना घेतला नव्हता.

त्यामुळे बेकायदेशीररित्या हा व्यवसाय सुरू होता, हे चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पब हाऊस मालकाचीही जबानी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे यांचे पणजी-रायबंदर मार्गावर ‘होबळेज रिव्हर लाँज हॉटेल’च्या बाजूला एम.के. पब हाऊस आहे.

त्यांनी बंगळुरूस्थित महेश भास्कर हेगडे याच्याशी करार करून भाडेपट्टीवर व्यवसायासाठी दिले होते. त्याने व्यवसायाच्या नावाखाली डान्स बार तसेच तरुणींची वेश्‍या व्यवसायासाठी तस्करी केली होती.

जुने गोवे पोलिसांनी सुटका केलेल्या पीडित तरुणींच्या जबान्या नोंद केल्या आहेत. संशयित हेगडे जोडप्याकडून वेश्‍या व्यवसायासाठी होणारे अत्याचार व मारझोड यासंदर्भातील माहिती त्यांनी दिली आहे. नेपाळ देशातील या सर्व तरुणी गरीब कुटुंबातील असून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणले होते. पोलिसांनी अटक केलेल्या तिघा संशयितांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने ती वाढवून घेण्यासाठी शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांनी कारवाई केलेल्या दिवशीच संशयितांना अटक करून एम.के. पब हाऊस कुलूप लावून बंद केले आहे. इतर कोणत्याही व्यापारासाठी ते कायमचे बंद करण्यासाठीचा प्रस्ताव न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दिला आहे. या प्रस्तावावर पोलिस तसेच पब हाऊसच्या मालकाची बाजू ऐकून घेऊन निर्णय दिला जाणार आहे. या प्रकरणाचा तपास जुने गोवे पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT