Luisin Falero Dainik Gomantak
गोवा

Goa Politics| फालेरोंना वगळून ‘तृणमूल’ची समिती

गोवा तृणमूल काँग्रसेने आपली राज्य समिती नव्याने जाहीर केली असून खासदार लुईझिन फालेरो यांना समितीत स्थान मिळाले नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा तृणमूल काँग्रसेने आपली राज्य समिती नव्याने जाहीर केली असून खासदार लुईझिन फालेरो यांना समितीत स्थान मिळाले नाही. समील वळवईकर आणि मारियानो रॉड्रिग्ज यांना राज्याचे संयुक्त निमंत्रक म्हणून निवडण्यात आले आहे. पक्षाचे गोवा प्रभारी किर्ती आझाद यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत केली.

(Luisin Falero has no place in the new state committee of the Goa Trinamool Congress)

लुईझिन फालेरो यांना समितीत स्थान का देण्यात आले नाही? या प्रश्‍नाचे उत्तर आझाद यांनी दिले नाही. समितीमध्ये उत्तर गोवा अध्यक्ष राजेंद्र काकोडकर, दक्षिण गोवा अध्यक्ष डॉ. जोर्सन फर्नांडिस, उत्तर गोवा सहअध्यक्ष कांता गावडे, दक्षिण गोवा सहअध्यक्ष शिवदास नाईक. सरचिटणीस पदांवर अविता बांदोडकर, प्रतिभा बोरकर, गांधी हेंरिक्स, मारिया पिंटो, राखी नाईक, व्हिक्टर गोन्साल्विस, सचिन घोटगे, केनेडी आफोन्सो, दशरथ मांद्रेकर आणि शितील गुंजकर आहे. सचिव पदावर मारिया लोपेझ, गिलरोय कॉस्टा, राजेश नाईक, महेश भंडारी आणि गणपत गावकर आहे.

महिला विभागात समन्वयक अविता बांदोडकर, सह-समन्वयक प्रतिभा बोरकर. युवा विभाग समन्वयक अँथनी पिशोट, सदस्य नवीन फळदेसाई, राहुल शेट्ये आणि ज्योकिम फर्नांडिस आहे. संवाद विभाग समन्वयक ट्रोजन डिमेलो, प्रवक्ते जयेश शेटगावकर, पिटर आफोन्सो आणि ॲना ग्रेशिएस आहे. अल्पसंख्याक विभाग समन्वयक सुलताना शेख, सहसमन्वयक विन्सेंट फर्नांडिस, सदस्य सांतान डायस आणि अपसरा खान. अनुसूचित जाती समन्वयक संतोष शंकर मांद्रेकर. इतर मागासवर्गीय विभागाचे समन्वयक आनंद नाईक. सदस्य मोहीम विभाग समन्वयक सिद्धेश्‍वर मिश्रा आणि सदस्य नविदा हबीब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

SCROLL FOR NEXT