LPG Gas Cylinder Price Hike In Goa From 1st December
पणजी: एलपीजी सिलिंडरची दरवाढ १ डिसेंबरपासून अंमलात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील वाढीचा रेस्टॉरंट, हॉटेल व इतर लघु उद्योगावर परिणाम दिसून येणार आहे. मागील पाच महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरचा दर १६६ रुपयांनी वाढला आहे.
आत्ता झालेली दरवाढ पुढे आणखी काही काळ अशीच होत राहिल्यास खाद्यपदार्थ व जेवणाच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या (१४.२ किलो) दरामध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही.
देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून, मोठ-मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळी वाढ झाली आहे. ही दरवाढ १६.५० ते १८.५० रुपयांपर्यंत आहे. मोठ्या शहरातील व्यावसायिक सिलिंडरचा दरावर नजर टाकली तर दिल्लीतील १९ किलो सिलिंडरचा दर १८०२ रुपयांवरून १,८१८.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये तो दर १,९२७ रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईत १६.५० रुपयांनी वाढ होऊन तो १,७७१ रुपयांवर गेला आहे, तर गोव्यात हा दर १,८८६.५० वर गेला आहे.
गुड रिटर्न्स या संकेतस्थळावरून उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या दराचा विचार केला तर १६६.०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर वर्षभरात आठ महिन्यांत २१३ रुपयांनी व्यावसायिक सिलिंडरची दरवाढ झाल्याचे दिसून येते.
याशिवाय एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरचे दर १५२ रुपयांनी कमी झाल्याचे दिलेल्या तपशिलावरून दिसून येते. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ही वाढ झाल्याने खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले असले तरी घरगुती सिलिंडरचे दर न वाढवता सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे.
रेस्टॉरंट, हॉटेल्समधील खाद्यपदार्थ किंवा नाष्ताचे दर हे दरवर्षी वाढत नाहीत. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढत राहतात तर कधी कमीही होतात. परंतु सर्व वार्षिक खर्चाचा ताळेबंद करूनच मग पदार्थांच्या दरात वाढ केली जाते. व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले की हॉटेलच्या पदार्थांच्या दरात तत्काळ वाढ होईल, असे नसते. कोणताही व्यावसायिक सर्व खर्च पाहूनच दरवाढ करीत असतो, त्यामुळे सध्याचीही दरवाढ ही महिन्याकाठी होत आलेली वाढ म्हणूनच व्यावसायिक पाहत असतील, असे आपणास वाटते.प्रदीप धुरी, हॉटेल मालक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.