Navelim Cylinder Blast Dainik Gomantak
गोवा

Navelim Cylinder Blast: शांतीनगर-नावेली येथे चायनीज रेस्टॉरंटमध्ये सिलिंडरचा स्फोट, आगीत लाखोंचं नुकसान

Margao LPG Cylinder Blast: शांतीनगर-नावेली येथील एका चायनीज फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये सोमवारी (ता.२१) रात्री एका भरलेल्या एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: शांतीनगर-नावेली येथील एका चायनीज फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये सोमवारी (ता.२१) रात्री एका भरलेल्या एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली. या आगीत सुमारे लाखभर रुपयांची हानी झाली तर अग्निशामक दलाने सुमारे पाच लाखांची मालमत्ता वाचविण्यात यश मिळविले.

सिलिंडरचा स्फोट झाल्याने हे चायनीज रेस्टॉरंट पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले. चायनीज फास्ट फूडला लागलेली आग लगतच्या भाजीपाला विक्रीच्या दुकानाला तसेच जवळच्या व्यावसायिक आस्थापनामध्ये पसरण्यापूर्वी, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विझली, त्यामुळे संभाव्य हानी टळली.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी एक रिकामा एलपीजी सिलिंडर परिसरातून यशस्वीरित्या काढून टाकला, ज्यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही.

अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आजूबाजूचा परिसर कसून तपासला व अन्य धोका नसल्याचे स्पष्ट केले. हे चायनीज फास्ट फूड रेस्टॉरंट मुहम्मद मुल्ला यांच्या मालकीचे होते, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT