Goa Theft Case Dainik Gomantak
गोवा

Lotulim Theft: घरफोडीत ११ लाखाचे दागिने लंपास; लोटली येथील घटना

Goa Theft Case: चोरट्यांनी मागच्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून कपाटे फोडून आतील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : गोव्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. काल पहाटे लोटली येथील एका घरात चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे ११ लाखाचे दागिने लंपास केले. ब्रिमा क्वाद्रूश यांनी या संदर्भात मायणा कुडतरी पोलिसात तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत. ही घरफोडी पहाटे दीड ते दोनच्या सुमरास घडली.

रात्रीच्या वेळी चोरट्यांनी मागील दरवाजातून घरात प्रवेश करून ही चोरी केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या घराचे खरे मालक ‘युके’ मध्ये स्थायिक असून या घरात तीन चारच माणसे राहतात. काल या घरात ब्रीमा आणि आणखी एक मुलगी झोपली होती. ते दोघेही गाढ झोपेत असताना या चोरट्यांनी मागच्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून कपाटे फोडून आतील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.

या चोरीत नेमका किती ऐवज चोरट्यांनी पळविला याचा तपशील सध्या पोलीस घेत आहेत. या भागात असलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या छबीची पडताळणी केली जात असल्याचे पोलीस निरिक्षक अरुण देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT