Bori Bridge Dainik Gomantak
गोवा

Bori Bridge : बोरी पुलाच्या प्रस्तावित जागेला विरोध; एनजीटीकडे दाद मागणार

गोमन्तक डिजिटल टीम

Bori Bridge

मडगाव, जुवारी नदीवरील नवीन बाेरी पूल बांधण्‍यासाठी जी जागा निश्‍चित केली आहे, त्‍या जागेला लोटलीतील शेतकऱ्यांनी विरोध केला असून या जागेत पूल बांधण्‍यास नदीकाठी असलेल्‍या खाजन शेतीवर त्‍याचा विपरित परिणाम होणार असल्‍याचा दावा केला आहे.

या प्रस्‍तावाला विरोध करण्‍यासाठी प्रसंगी आम्‍ही एनजीटीकडे किंवा उच्‍च न्‍यायालयात दाद मागू असा निर्धार, आज लोटलीच्‍या ग्रामस्‍थांनी व्‍यक्‍त केला.

नवीन बाेरी पुलासाठी जागा आरेखित करण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे अधिकारी आज लोटलीत येणार, अशी माहिती मिळाल्‍यानंतर ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने या नियोजित जागी एकत्र झाले होते. त्‍यात ९५ वर्षाच्‍या वृद्धाचाही समावेश होता. पोलिस बंदोबस्‍तात ही आरेखन प्रक्रिया पार पाडली जाणार, असे सांगितले गेले होते. मात्र मोठ्या प्रमाणावर लोक जमल्‍यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांनी तेथे येणे टाळले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आल्‍बर्ट पिन्‍हेरो यांनी, आमचा बोरी पुलाला विरोध नाही, मात्र हा पूल बांधण्‍यासाठी जी जागा निश्‍चित केली आहे, त्‍याला आमचा विरोध आहे. यापूर्वी मिसिंग लिंक रस्‍ता बांधताना या भागातील सात खाजन शेतजमिनीची नासाडी झाली होती.

आता पूल बांधण्‍यासाठी जर या जागेचा वापर करणार असतील तर मोठ्या प्रमाणावर खाजन जमिनी बुजून जाईल आणि या खाजन शेत जमिनीवर पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांच्‍या पोटावर पाय दिल्‍यासारखे होईल, असे त्‍यांनी सांगितले.

या ग्रामस्‍थांबरोबर गावचे सरपंच फ्रान्‍सिस्‍को फर्नांडिस आणि उपसरपंच सेलिना बोर्जिस हेही उपस्‍थित होते. नव्‍या बोरी पुलासाठी जागा निश्‍चित करताना सार्वजनिक बांधकाम खात्‍याने स्‍थानिक पंचायतीला अंधारात ठेवले, असा आरोप त्‍यांनी केला.

स्‍थानिकांना विश्‍वासात घ्‍या : सरदेसाई

नवीन बोरी पुलाच्‍या प्रस्‍तावित जागेला लोटलीसह बोरीच्‍या स्‍थानिकांनीही विरोध केला आहे. या जागेत पूल आल्‍यास खाजन शेतजमिनी नष्‍ट होतील, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. त्‍यामुळे स्‍थानिकांना विश्‍वासात घेऊनच सरकारने हे काम पुढे न्‍यावे, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

खाजन शेत जमिनी ही आमची परंपरा आहे. आणि त्‍या राखून ठेवणे गरजेचे आहे. बोरी पुलाला विराेध नाही. मात्र हा पूल स्‍थानिकांवर थोपविला जाऊ नये असे सरदेसाई म्‍हणाले. या पुला संदर्भात सरकारने लोकांच्‍या विरोधात भूमिका घेतली तर लोकांबरोबर रस्‍त्‍यावर उतरून या प्रकल्‍पाला आपण विरोध करू, असे सरदेसाई म्‍हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: हिंदुत्ववादी संघटनांचे वेलिंगकरांना समर्थन, ख्रिस्ती समाजाकडून अटकेची मागणी; राज्यभरात मोर्चे

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

Goa Navratri 2024: छत्रपती शाहू महाराजांच्या सातारा दरबारातील सरदाराने गोव्यात बांधलेले एकमेव मंदिर

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Goa Crime News: पैशांसाठी मित्रांचा खून करणारा काजीदोनी दोषी; संशयिताची बाजू ऐकून कोर्ट ठोठावणार शिक्षा

SCROLL FOR NEXT