Mangesh Temple Goa | Mahashivratri 2024 Dainik Gomantak
गोवा

Mangesh Temple Goa: पार्वतीसोबत वाद झाला अन् महादेवाने हिमालय सोडला, गोव्यातील मंगेशी संबधित स्कंदपुराणातील कथा काय?

Shree Mangesh Temple: गोव्यातील मुख्य शिवलिंग मांगिरीश म्हणून ओळखले जाते, त्याचा पुढे अपभ्रंश होऊन मंगेशी असा झाल्याचे सांगितले जाते.

Pramod Yadav

Shree Mangesh Temple

जुलमी पोर्तुगीज राजवटीखाली 450 वर्षे राहिलेल्या गोव्यात अनेक प्राचीन मंदिर आहेत. येथील मंदिरांचा मोठा इतिहास सांगितला जातो. प्रभू परशुरामाने बाण मारून निर्माण केलेल्या या गोमन्तक भूमीत विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

गोव्यातील मुख्य शिवलिंग मांगिरीश म्हणून ओळखले जाते, त्याचा पुढे अपभ्रंश होऊन मंगेशी असा झाल्याचे सांगितले जाते. मंगेशीच्या स्थापनेबाबत स्कंदपुराणात एक कथा सांगण्यात आली आहे.

स्कंदपुराणातील कथा काय आहे?

महादेव आणि पार्वती (Lord Shiva And Parvati) यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वाद झाल्यानंतर महादेवाने हिमालय सोडला. महादेव हिमालयातून दक्षिण गोव्यात आले, पार्वती देखील त्यांचा शोध घेत गोव्यात दाखल झाल्या.

पार्वती गोव्यात आल्याची माहिती मिळताच महादेवाने वाघाचा अवतार धारण केला. वाघाच्या अवतारातील महादेवाने पार्वतीच्या अंगावर धाव घेतली. यावेळी माता पार्वतीने 'मांगिरीश त्राहि' म्हणजे शंकरा माझे रक्षण कर असे म्हणण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याच्या मुखातून मांगीश असा शब्द उच्चारला गेला.

महादेवाने प्रसन्न होऊन माता पार्वतीला वर मागण्यास सांगितले, त्यावेळी नाथ तुम्ही याच भूमीत मांगीश नाव धारण करुन वास्तव्य करावे अशी पार्वती मागणी करते. भगवान शंकर पार्वतीची ही इच्छा पूर्ण करतात. पुढे मांगीश या शब्दाचा अपभ्रंश होऊन तो मंगेश असा झाला.

फोंडा तालुक्यातील प्रियोळ येथे असणारे श्री मंगेशी देवस्थान गोव्यातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक या मंदिराला भेट देत असतात.

स्कंदपुराणातील मंगेशी संबधित ही माहिती गोवा मुक्तिसंग्राम या पुस्तकात देण्यात आली आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे आणि दुर्गेश परुळकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर

तांबडी सुर्ला गोव्यातील एक महत्त्वपूर्ण आणि प्राचीन मंदिर आहे. सांगे तालुक्यातील भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानात हे मंदिर आहे. 12व्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरासाठी काळ्या बेसाल्ट दगडाचा वापर करण्यात आला आहे.

मंदिरातच्या गर्भगृहात एक शिवलिंग असून, महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक मंदिराला भेट देत असतात.

महाशिवरात्रीला या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT