Goa EV Subsidy: इलेक्ट्रिक वाहनांवर गोवा सरकारची 1 लाख सबसिडी कशी मिळवाल? संकेतस्थळाचे अनावरण

Goa EV Subsidy: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (07 मार्च) संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे.
Goa EV Subsidy
Goa EV Subsidy Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa EV Subsidy

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सरकार सबसिडीच्या माध्यमातून ग्राहकांना प्रोत्साहन देत आहे. गोवा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी देण्याची पुन्हा घोषणा केली असून, यासाठी आता स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज (07 मार्च) संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे.

गोवा उर्जा विकास एजन्सी आणि एएचए सोलर टेक लि. यांनी संयुक्तपणे या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. सरकारने Goaev.in संकेतस्थळ सर्वांसाठी खुले केले आहे.

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणारे आणि वापरकर्ते यांना सबसिडी (अनुदान) मिळविण्यासाठी सरकारचे हे संकेतस्थळ सिंगल विन्डो माध्यम असेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

Goa EV Subsidy
Naval War College Video: गोव्यातील नौसेना युद्ध महाविद्यालय आतून कसे दिसते? पाहा व्हिडिओ
Goa EV Subsidy
Goa EV Subsidy

गोव्यातील इलेक्ट्रिक वाहन धारकांनाच हे अनुदान मिळणार आहे. यामध्ये एक लाख 10 हजार रुपयांपर्यंत अनुदानाची तरदूत आहे. EV वाहन धारकांना Goaev.in संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर अप्लाय ऑनलाईनचा पर्याय दिसेल.

यावरुन एक नवीन पेज समोर येईल, यात तुमच्या मालकीच्या इलेक्ट्रिक वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून पुढे जा (प्रोसिड) या पर्यायावर क्लिक करायचे आहे. पुढील पानावर अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक बाबींचा पूर्तता करावी लागेल. सर्व अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करावा लागणार आहे.

Goa EV Subsidy
Panaji-Hyderabad Economic Corridor: पणजी - हैद्राबाद इकॉनॉमिक कॉरिडोअरसाठी 2,675.31 कोटी, उद्योग क्षेत्राला होणार फायदा

गोवा सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवरील अनुदान देणे बंद करण्याची करण्याची घोषणा गेल्या वर्षीच्या अधिवेशनात केली होती. दरम्यान, नुकतेच फेब्रुवारीत पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

गोवा सरकार देखील सर्व सरकारी कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन वापर वाढविण्यासाठी भर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com