Lonavala Accident Goa Two Tourist Death Dainik Gomantak
गोवा

Lonavala Accident: लोणावळ्यात भीषण अपघात..! अनियंत्रित कारची ट्रकला धडक, गोव्यातल्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू

Lonavala Accident Goa Two Tourist Death: लोणावळा परिसरातील टायगर पॉईंटजवळ झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Sameer Amunekar

लोणावळा परिसरातील टायगर पॉईंटजवळ झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने पर्यटकांच्या कारला समोरासमोर धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा चक्काचूर झाला आणि दोन्ही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना लोणावळ्यातील लोकप्रिय टायगर पॉईंटलगतच्या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास घडली. गोव्याहून आलेले पर्यटक कारने सहल करण्यासाठी लोणावळ्यात आले होते. मात्र, घाटमाथ्यावरून खाली उतरताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगात समोरून येणाऱ्या डंपरला जाऊन धडकली. धडक एवढी भीषण होती की कारचा पुढचा सर्व भाग पूर्णपणे नष्ट झाले.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत कारमधील जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचेही मृत्यू तत्काळ झाल्याचे आढळून आले. अपघातस्थळावर मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलीस पथकाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवले.

या रस्त्यांवर मोठ्या वाहनांची गर्दी वाढत असून, ड्रायव्हर्सचा वेग आणि खबरदारीचा अभाव यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. टायगर पॉईंट परिसरात पर्यटकांची मोठी वर्दळ असताना वाहतूक व्यवस्थेची योग्य काळजी घेतली जात नसल्याचेही समोर येत आहे. अशा ठिकाणी वेगमर्यादा, सीसीटीव्ही, स्पीड ब्रेकर आदी सुरक्षाव्यवस्थांची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दरम्यान, लोणावळा पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. अपघाताचे खरे कारण वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती किंवा चालकाची चूक यापैकी नेमकं काय हे शोधण्यासाठी पोलिस विविध कोनातून चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

मुरगावच्या SGPDA मच्छी मार्केटमध्ये प्रचंड अस्वच्छता! डासांची पैदास वाढल्याने स्थानिकांचा संताप

IND vs SA: 'शतकवीर' क्विंटन डी कॉक! टीम इंडियाविरुद्ध 'असा' विक्रम करणारा पहिला आफ्रिकन खेळाडू

SCROLL FOR NEXT