Temple Theft Canva
गोवा

Loliem Theft: लोलये देवालय चोरीतील अज्ञात सीसीटीव्हीत कैद! पोलिसांचा तपास सुरु

Loliem Temple Theft: लोलये देवालयातील फंड पेटी फोडल्याप्रकरणी अद्याप पोलिसांना धागेदोरे सापडले नाहीत. लोलये पंचायत क्षेत्रातील श्री केशव देवालय व श्री दामोदर देवालय तसेच संलग्न देवालयातील सहा फंड पेट्या फोडून त्यातील पैसे लंपास केले.

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: लोलये देवालयातील फंड पेटी फोडल्याप्रकरणी अद्याप पोलिसांना धागेदोरे सापडले नाहीत. लोलये पंचायत क्षेत्रातील श्री केशव देवालय व श्री दामोदर देवालय तसेच संलग्न देवालयातील सहा फंड पेट्या फोडून त्यातील पैसे लंपास केले. ही घटना रविवारी रात्री सुमारे अकरा वाजता घडली. देवालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, मात्र अज्ञात चोरट्याची ओळख पटत नसल्याचे श्री केशव देवालय संस्थानचे अध्यक्ष विठ्ठल प्रभू माळयार यांनी सांगितले.

सकाळी देवस्थान समितीने माहिती दिल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे मात्र एकाच रात्री दोन देवालये व त्यांच्या संलग्न देवालयात घुसून अज्ञात चोरट्यांनी फंड पेट्या फोडल्या.दर दोन महिन्यांनी या फंड पेट्यातील रक्कम देवालय समिती काढत असते.

मात्र, सध्या नवरात्रोत्सव चालू असल्याने नवरोत्सवानंतर या फंड पेट्या उघड्या करण्याचे समितीने ठरविले होते.श्री केशव देवालयाबरोबरच संलग्न श्री महादेव देवालय, श्री ब्रम्हा देवालय, श्री मारूती या देवालयाच्या पाच फंडपेट्या फोडून सुमारे पंधरा हजार रूपयांवर डल्ला मारला आहे, असे अध्यक्ष प्रभू माळयार यांनी सांगितले.

चोरट्यांनी फंड पेट्या फोडण्यासाठी लोखंडी सळ्यांचा वापर केला आहे. तसेच श्री दामोदर देवालयातील फंड पेटी लोखंडी तुळई घेऊन उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला.त्याचप्रमाणे गर्भगृहाचा दरवाजा तोडून अर्चकाने गर्भागृहात ठेवलेले तीन हजार रूपये लांबविले आहेत

पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोरीचा पंचनामा केला.पोलिस फुटेजच्या साह्याने पुढील तपास करीत आहेत. पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले,की अद्याप त्या संदर्भात तपास सुरू आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार रविवारी लोलये येथील श्री आर्या दुर्गा देवालयात नवरोत्रोत्सवानामित्त पूजा होती.

पूजा आटोपून घरी परतत असताना काहींनी या पंगू संशयिताला पाहिले होते. त्याने काळे कपडे घातले होते. त्याचदिवशी चोरट्याने दापट येथील घर फोडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT