Loksabha Election Voting Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election Voting : सहा महिन्‍यांपासून तयारी, मेहनत! म्‍हणूनच मतदानाचा टक्‍का वाढवण्‍यात भाजपला आले यश

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election Voting :

पणजी, लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रत्येक मतदाराने मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने ठरवले होते.

उमेदवार जाहीर होण्याआधी भाजपच्या ‘कमळ’ या निवडणूक चिन्हाला मतदान करा, असा प्रचार ज्यावेळी केला जात होता, त्याचवेळी मतदानाचा टक्का वाढवण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही मतदानाचा टक्का वाढवण्यात भाजपला यश आले.

निवडणूक यंत्रणेला याचे श्रेय का नको? असा प्रश्न पडू शकतो. मतदार अधिकारी दर निवडणुकीपूर्वी जनजागृती करतात; पण त्यांना मर्यादित यश मिळते, असे दिसून येत आहे. भाजपने केवळ मतदानाविषयी माहितीच दिली नाही, तर प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी मतदारांशी दूरध्वनीवर संपर्क साधून मतदान करण्याविषयी आठवण करून दिली. यामुळे मतदानाचा टक्का वाढवण्यात भाजपचा हातभार मोठा आहे, असे मानता येते.

व्हॉटसॲप क्रमांक, ईमेल पथ्यावर

या साऱ्याची सुरुवात भाजपने सहा महिने अगोदरच केली होती. प्रत्येक मतदाराचा व्हॉटसॲप क्रमांक, ईमेल आदी माहिती भाजपने मतदाराकडून मिळवली होती.

मतदान केंद्रनिहाय त्यांचे गट तयार केले होते. समाज माध्यमे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतलेले मतदान केंद्र पातळीवरील कार्यकर्ते हे गट हाताळत होते.

भाजपच्या सरकारांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवर केलेल्या कामांची माहिती त्या मतदारांना देणे त्यांनी सुरू ठेवले होते.

हे मुद्दे ठरले प्रभावी

१ मतदारांच्या घरात कोणत्याही सरकारी योजनेसाठी पात्र अशी कोणती व्यक्ती आहे आणि ती त्या लाभापासून वंचित असेल तर त्या व्यक्तीला लाभ देण्यासाठी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे एकेक कुटुंब भाजपशी जोडत भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीच्या दिशेने पुढे सरकत होते.

२ सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना सरकारमुळे त्यांना किती लाभ झाला व किती लाभ होणार आहे, याची जाणीवपूर्वक माहिती देण्यासाठी त्यांचे संमेलने घेण्यात आली. बचतगट, स्वयंसेवीगट या माध्यमातून रोजगाराकडे वळलेल्या महिलांची संमेलने घेतली गेली. त्यांनीही देश उभारणीसाठी मतदान केले पाहिजे, हे त्यांना पटवून देण्यात आले होते.

३ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपचे मतदान केंद्र पातळीवर मतदार याद्या तयार केल्या होत्या. त्या यादीच्या प्रत्येक पानाच्या प्रमुखपदी एका कार्यकर्त्याची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्यावर त्या पानात नोंद सर्वांनी मतदान केले पाहिजे आणि त्यांपैकी बहुतांश जणांनी भाजपसाठी मतदान केले पाहिजे, याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती. या सगळ्याचा परिपाक म्हणून भाजपला आपल्या बाजूने मतदानाचा टक्का वाढवण्यात यश आल्याचे दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT