Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : सत्तरीत ‘डबल इंजीन’चा वेग वाढतोय! भाजपच वरचढ

Loksabha Election : विश्‍‍वजीत-दिव्‍या राणे दाम्‍पत्‍यामुळे बाजू आणखी मजबूत

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

वाळपई, लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू असली तरी सत्तरी तालुक्यात अजून म्‍हणावी तशी लगबग सुरू झालेली नाही. येथे लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीला जास्त महत्त्‍व दिले जाते.

तालुक्‍यातील वाळपई व पर्ये मतदारसंघातील जनता नेहमीच, ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदान करते. गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना या तालुक्‍याने भरभरून साथ दिली आहे.

सत्तरीत श्रीपाद नाईक यांची जादू आजही कायम आहे. त्यांनी यापूर्वी जुन्या भाजप कार्यकर्त्यांच्‍या मनात जी आपुलकी निर्माण केलेली आहे, तीसुद्धा तशीच आहे. नगरगाव, खोतोडे तसेच अन्य पंचायत क्षेत्रात नाईक यांच्‍या समर्थकांची संख्‍या मोठी आहे.

वाळपई व पर्ये मतदारसंघात जे राणे समर्थक आहेत, त्‍यांची मते तिकीट मिळाली तर श्रीपाद नाईक यांनाच मिळतील यात दुमत नाही.

गेल्या पाच वर्षात सत्तरी तालुक्‍यात खासदार निधीतून तशी कामे झाली झालेली नाहीत. त्‍यामुळे काही लोक विरोधात जाण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

तरीसुद्धा भाजप उमेदवाराला भरघोस मतदान होऊ शकते, कारण राणे यांच्याविरोधात कोणी जाण्‍याची शक्‍यता नाही. उत्तर गोव्यात सर्वांचे लक्ष सत्तरीवर आहे. आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे उत्तर गोव्यातून भाजपला लीड मिळू शकते.

गेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगले मताधिक्य मिळाले होते. भाजपचे श्रीपाद नाईक व काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांच्यात गेल्‍या वेळी सरळ लढत झाली होती. आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सत्तरी तालुक्‍यात भाजपची मते कमालीची वाढली.

तसेच पर्ये मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा आमदार असतानाही भाजपला दहा हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी हे मताधिक्य आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तालुक्‍यात सर्वत्र वाहतेय विकासगंगा

सत्तरीत भाजप असो काँग्रेस असो किंवा आरजी, सर्वच जण झोकून देऊन काम करणार हे निश्‍चित. विधानसभा निवडणुकीत ‘आरजी’ला वाळपई मतदारसंघात तशी चांगली मते मिळाली होती. मात्र ती मते कोणाची, हा प्रश्‍‍न राणे यांना पडला आहे.

त्‍याची पुनरावृत्ती होणार का, हेसुद्धा पहावे लागेल. सत्तरीत अजून तरी भाजप सोडला तर कोणत्‍याही पक्षाचा आवाज नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे. आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून सत्तरी तालुक्‍यात खऱ्या अर्थाने विकासगंगा आली. बेरोजगारांना रोजगार, गावागावांत मंदिरांची उभारणी, इस्‍पितळे, मैदाने, गुळगुळीत रस्ते तसेच कित्‍येक विकासाभिमुख प्रकल्‍प आले.

प्रतापसिंह राणे यांच्‍या वाढदिनीच फुटला नारळ!

सत्तरीत लोकसभा निवडणुकीचा नारळ हा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या अलीकडेच झालेल्‍या वाढदिनी फुटला असे म्‍हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण यावेळी राजकीय नेते व नागरिकांची उपस्‍थिती खूप मोठी होती.

वाळपई, पर्ये व उसगाव भागातून लोक बसेस भरून आले होते. मात्र असे असले तरी काही लोक श्रीपाद नाईक यांच्‍यावर नाराजही आहेत. त्‍यांनाच परत परत तिकीट का?, नव्‍यांना संधी का नको? असे सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू सत्तरीतही आहे. कारण या तालुक्‍याच्या विकासासाठी त्‍यांनी सदाच मदतीचा हात पुढे केला आहे.

‘डबल इंजीन’ सरकारमुळे गेल्या दोन वर्षांत आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे व आमदार डॉ. दिव्‍या राणे या दाम्‍पत्‍याने तालुक्‍याचा झपाट्याने विकास केला आहे. त्यामुळे भाजपच्‍या उमेदवाराला चांगली मते मिळतील अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT