CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी नावेली मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचार कार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

मडगाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत बनून मतदारांकडे जा व विकसित भारतचा संकल्प केलेल्या मोदी यांच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या नावेलीतील कार्यकर्त्यांना केले.

शांतिनगर-आके बायश येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपचे राज्य सचिव व दक्षिण गोवा सहप्रभारी सर्वानंद भगत, नावेली प्रभारी सुबोध गोवेकर, विस्तारक भावेश जांबावलीकर, नावेली मंडळाचे अध्यक्ष परेश नाईक, मंडळाचे सरचिटणीस प्रमोद प्रभू, सचिव कपिल सरदेसाई,

दिकरपाल दवर्लीचे सरपंच संतोष नाईक, पंच विद्याधर आर्लेकर, संपदा नाईक, आके बायशचे पंच अविनाश सरदेसाई, अमिशा तिळवे, नावेलीचे पंच दामोदर चव्हाण, मायकल कार्दोझ, रुमडामळ दवर्लीचे पंच विजय सुरमे व विनायक वळवईकर, नावेली महिला मोर्चाच्या अध्यक्ष मधुकला शिरोडकर आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी नावेली मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचार कार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तसेेच कार्यकर्त्यांना काही आवश्‍यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. नावेलीतील कार्यकर्ते झपाटून काम करत असून या मतदारसंघात महिला कार्यकर्त्याचे योगदान विशेष आहे, असे ते म्हणाले.

नावेलीतून धेंपेंना १० हजार मते : तुयेकर

नावेलीत भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांचा नेटाने प्रचार करण्यात येत असून नावेलीत भाजपमय वातावरण तयार झाले आहे, असे तुयेकर यांनी सांगितले. भाजपला नावेलीतून १० हजार मते मिळवून देण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधला असून कार्यकर्ते हे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT