Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : मोठ्या संख्येने मतदान करा; राज्य निवडणूक आयोग

Panaji News : या रॅलीत निवडणूक अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती व अन्य नागरिक सहभागी झाले. यावेळी निवडणूक चिन्हांचेही प्रदर्शन करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, राज्यात ७ मे रोजी दोन लोकसभेच्या जागांसाठी मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, राज्य मुख्य निवडणूक आयोगातर्फे रविवारी मीरामार सर्कल ते गोवा सायन्स सेंटरपर्यंत रन फॉर वोट रॅली आणि ई-रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत निवडणूक अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग व्यक्ती व अन्य नागरिक सहभागी झाले. यावेळी निवडणूक चिन्हांचेही प्रदर्शन करण्यात आले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या महत्त्वावर भर दिला. लोकांनी मोठ्या संख्येने मतदान करून देशाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनीही नागरिकांनी पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केले.

रन फॉर व्होट रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी झालेले दिव्यांग मतदार ताहा हझिक यांनीही सर्वांनी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

हक्क बजावा...

मतदान हा लोकशाहीने आपलेला दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. आपले मत हे देशासाठी असते. त्यामुळे लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात माेठ्या संख्येने सहभागी व्हा व मतदानाचा हक्क बजावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात काँग्रेसची 'छात्रों की गुंज' मोहीम; पेपरफुटी, बेरोजगारीविरोधात राज्यात जनजागृती

Goa Heavy Rain: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! धावत्या कारवर कोसळले झाड; आई अन् दोन मुले सुखरूप

Goa Heavy Rain: साळ-खोलपेवाडी येथे घरावर कोसळला वृक्ष; दोन लाखांच्या मालमत्तेचे नुकसान, अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

Goa Water Supply: धरणांमधील पाणी वाढवण्‍यावर आता जलसंपदा खात्‍याचे लक्ष; शुद्धीकरणासाठी 'पेयजल'क‍डून नद्यांतील पाण्‍याचा वापर

Borim Bridge: लाखो रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात बोरी पुलावर खड्डे; दुरुस्ती कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT