Goa Loksabha Election  Dainik Gomantak
गोवा

Tiswadi News : सांतआंद्रेत नेतृत्व ठरणार निर्णायक! तज्ज्ञांचे मत

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi News :

तिसवाडी, लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय वातावरण बरेच तापले आहे. तिसवाडीत भाजपची वाटचाल कठीण असून त्यांना कंबर कसावी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

यात सांतआंद्रे मतदारसंघ हा सांताक्रुझ, कुंभारजुवेसोबतच महत्त्वाचा ठरणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सांतआंद्रेत काँग्रेसने आघाडी मिळवली होती; परंतु त्यावेळी त्यांच्या ताफ्यात तत्कालीन आमदार फ्रान्सिस सिल्वेरा होते. यंदा सिल्वेरा हे भाजपच्या बाजूने असल्याने भाजपचे हात बळकट झाले आहेत. याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत दक्षिण गोव्याचे रहिवासी गिरीश चोडणकर यांनी उत्तरेतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, तेव्हा सिल्वेरा यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून त्यांना आघाडी मिळवून दिली होती. जुलै २०१९ मध्ये सिल्वेरा भाजपवासी झाले होते. तेव्हापासून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सांतआंद्रेत नवीन नेतृत्व उभे केलेले नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने भाजपमधून नाराज झालेले टोनी फर्नांडिस यांना आणले होते; परंतु हा डाव फसला आणि ते निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आले. हेच नव्हे तर तेव्हापासून ते गायब आहेत. पक्षाचे नेतृत्वच नसल्याने पाच वर्षांपूर्वी असलेल्या आपल्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आहे की नाही, तेच लोकांना कळेनासे झाले आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रचार सुरू असून पक्षाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा प्रचारदेखील झाला आहे. दुसऱ्या बाजूला रिव्होल्युशनरी गोवन्सचा मतदारसंघ असूनही अजूनही मनोज परब यांनी येथे प्रचार केलेला नाही. ‘आरजी’कडून प्रचारात तेवढी तीव्रतादेखील अद्याप दिसलेली नाही. तसेच इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रामकांत खलप यांचा प्रचार सुरू झालेला नसला, तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचे बरेच शुभचिंतक मतदारसंघात आहेत.

नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन

सांतआंद्रेत विविध मुद्दे घेऊन लढणाऱ्या नेत्यांना पसंती आहे. सुरवातीच्या काळात हा मतदारसंघ यूजी पक्षाकडे होता, नंतर हा काँग्रेसचा बालेकिल्ला झाला. २०१२ वगळता भाजपला येथे विजय मिळवता आलेला नाही.

२०२२ मध्ये प्रथमच ‘आरजी’चे वीरेश बोरकर येथे विजयी झाले होते. मतदारसंघाचे वैशिष्ट म्हणजे केवळ पैशांच्या जोरावर सांतआंद्रेत विजय मिळवता येणार नाही. अजूनही सांतआंद्रेवासीय जागरूक मतदार नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन करतात.

पूर्वी ख्रिस्ती बहुल असलेला हा मतदारसंघ आता हिंदू बहुल बनत चालला आहे; कारण ख्रिस्ती लोकांनी मोठ्या प्रमाणात परदेशात स्थलांतर केले आहे.

सांतआंद्रेतील भाजप संघटना मजबूत करण्यात आली आहे. गेल्यावेळी काँग्रेसने मतदारसंघात आघाडी घेतली होती; परंतु यंदा आम्ही त्याहून अधिक आघाडी घेणार आहोत. फ्रान्सिस सिल्वेरांच्या नेतृत्वाखाली आम्ही भाजपच्या विजयात योगदान देणार आहोत.

- आनंद वेर्लेकर, सांतआंद्रे भाजप मंडळ अध्यक्ष

२०२२च्या निवडणुकीत जरी ‘आरजी’चा आमदार बनला तरी अजूनही सांतआंद्रेवासीयांच्या मनात काँग्रेसच आहे. आम्ही कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यात कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला आहे. आम्ही आघाडी घेणार आहोत.

- मनोज पालकर, गटाध्यक्ष सांतआंद्रे, काँग्रेस

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Marine Projects: ..गोव्यात अखेर '23 प्रकल्‍पांची' मान्यता रद्द! रोजगार तसेच कोटींच्‍या गुंतवणुकीवर पाणी

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT