Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Loksabha Election 2024 : आरजीचे दक्षिण गोव्‍याचे उमेदवार रुबर्ट परेरा हे स्‍वत: एसटी समाजातील असून त्‍यामुळेच त्‍यांना या समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

मडगाव, एका बाजूने काँग्रेस पक्ष हा रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षाला भाजपची ‘बी टीम’ म्‍हणून हिणवत असताना, आरजीने आता ‘काँग्रेस उमेदवार निवडून आल्‍यास ते पूर्वीच्‍या ‍आमदारांप्रमाणेच भाजपमध्‍ये प्रवेश करणार आणि त्‍यामुळे तुमच्‍या मताला किंमत राहणार नाही’ असा प्रचार सुरू केला आहे.

विशेष म्‍हणजे सासष्‍टीतील एसटीबहुल भागात ‘आरजी’च्‍या या प्रचाराला चांगला प्रतिसादही मिळत असल्‍याचे दिसून येत आहे.

आरजीचे दक्षिण गोव्‍याचे उमेदवार रुबर्ट परेरा हे स्‍वत: एसटी समाजातील असून त्‍यामुळेच त्‍यांना या समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: कुडतरी, नुवे, नावेली आणि वेळ्‍ळी या भागात आरजीने ख्रिस्‍ती एसटी समाजावर आपला पगडा बसविला आहे.

त्‍यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. २०२२च्‍या विधानसभा निवडणुकीत आरजीने सासष्‍टीतील आठ मतदारसंघांत एकूण २०,८८३ मते प्राप्‍त केली होती. सध्‍याचे दक्षिण गोव्‍यातील आरजीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनी कुडतरीतून निवडणूक लढविली होती आणि त्‍यांना ३४७९ मते प्राप्‍त झाली होती.

ही मते ‘आप’ उमेदवारापेक्षाही जास्‍त होती. नुवे मतदारसंघात आरजीच्‍या उमेदवाराने ३३५८ मते घेत दुसरा क्रमांक मिळविला होता. बाणावली येथे ३८५४, वेळ्‍ळीत ३६५३, कुंकळ्‍ळीत २२२६, नावेलीत २०८६, फातोर्ड्यात १५०५ तर मडगावात ७२२ मते प्राप्‍त केली होती.

सासष्‍टीतच नव्‍हे तर जवळपासच्‍या केपे आणि सांगे तालुक्‍यातही आरजीने आपल्‍या प्रचाराचा जोर लावला आहे. तिथेही एसटी समाजाच्‍याच मतांचा फायदा घेण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न आहे.

‘आरजी’चा प्रभाव कमी करण्‍यासाठी काँग्रेस सक्रिय

ज्‍या एसटीबहुल भागात जाऊन आरजीने लोकांना आपल्‍या बाजूने आकर्षित करण्‍यास सुरूवात केली आहे, त्‍याच भागात आता काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते जाऊन ‘आरजीला मत देणे म्‍हणजे भाजपचा फायदा’ ही बाब लोकांना पटवून देण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत.

कॅ. फर्नांडिस यांच्‍याबरोबर पर्यावरण चळवळीत सक्रिय असलेले अभिजीत प्रभुदेसाई आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी आपल्‍या खांद्यावर घेतली आहे. आम्‍ही लोकांना आरजीच्‍या प्रचारातील फोलपणा दाखवून देऊ लागलो आहोत आणि त्‍यात चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.

फक्‍त एसटी समाजाकडूनच नव्‍हे तर सर्वांकडून आम्‍हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. गोव्‍यातील लोक भाजप व काँग्रेस या दोन्‍ही पक्षांना विटले आहेत. त्‍यामुळे त्‍यांना ‘आरजी’ हाच आता पर्याय दिसतोय.

- अँन्ड्यू रिबेलो, ‘आरजी’ अध्‍यक्ष (नावेली मतदारसंघ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT