Srinivas Dhempe Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : फुटबॉलच्या माध्यमातून पल्लवीला निवडणुकीत लाभ शक्य : श्रीनिवास धेंपो

Loksabha Election 2024 : आपण त्यांच्या घरी केवळ गेट टूगेदर आयोजित केला तेव्हा तिथे उपस्थित फुटबॉलशी संबंधित व्यक्तींबरोबर संवाद साधला, असेही श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

सासष्टी, धेंपे घराण्याने गोव्यात फुटबॉलचा दर्जा वाढविण्यात, हा खेळ कानाकोपऱ्यात पोहोचविण्यास तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू तयार करण्यात मोठे योगदान दिले आहे.

सासष्टीतील फुटबॉलपटू, फुटबॉल क्लब यांच्याशी चांगले नाते जुळलेले आहे. त्यामुळे फुटबॉलच्या माध्यमातून पल्लवीला निवडणुकीत लाभ होईल,असा विश्र्वास असल्याचे उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की आपण फुटबॉलपटू, फुटबॉल प्रशासक, फुटबॉल क्लब यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सुरू केले आहे. व त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

मात्र, निर्णय लोकांनी घ्यायचा आहे, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली. दक्षिण गोव्यातील अन्य काही फुटबॉलपटू, क्लबचे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत,असे धेंपे यांनी सांगितले.

फुटबॉलप्रेमींशी साधला संवाद !

काही दिवसांपूर्वी आपण माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्याकडे जाऊन आलो. त्याचे बंधू शुबर्ट फुर्तादो हे आपले चांगले मित्र. गोवा फुटबॉल असोसिएशनचे काम करताना आपला या घराण्याशी संबंध आलेला आहे.

आपण त्यांच्या घरी केवळ गेट टूगेदर आयोजित केला तेव्हा तिथे उपस्थित फुटबॉलशी संबंधित व्यक्तींबरोबर संवाद साधला, असेही श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT