Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Vasco News : गोमंतकीयांच्‍या हितासाठी लोकसभेत आवाज उठवणार

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वास्को, गोमंतकीयांच्‍या हितासाठी पुढील पाच वर्षे लोकसभेत आवाज उठविणार आहे. आपले ध्‍येय तेच आहे. केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदी करून मोठ्या उद्योगपतींना आणखी श्रीमंत करून ठेवले आहे.

मुरगाव, वास्‍कोत कोरोनामुळे नव्‍हे तर कोळसा प्रदूषणामुळे लोकांचे बळी गेले आहेत, असा सनसनाटी आरोप ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिणेतील उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केला.

मुरगाव पालिकेसमोर झालेल्‍या जाहीर सभेत फर्नांडिस बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा, दक्षिण गोवा काँग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, माजी उपनगराध्यक्ष

काशिनाथ यादव, गोवा प्रदेश काँग्रेस इतर मागासवर्गीय अध्यक्ष नितीन चोपडेकर, गोवा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष नियाजी शेख, माजी सरपंच राहुल डिकॉस्‍टा, ‘आप’चे ॲड. सुनील लॉरेन्‍स, काँग्रेसचे ओलेन्‍सियो सिमॉईश, तारा केरकर, माजी सरपंच सेबेस्तांव परेरा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

उपस्‍थित मान्‍यवरांनीही यावेळी विचार मांडले. सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष उलारिको रॉड्रिगीस यांनी केले तर शेवटी त्‍यांनीच आभार मानले.

दाबोळी विमानतळाचा प्रश्‍‍न लोकसभेत उपस्थित करून दक्षिण गोव्यातील जनतेला न्याय मिळवून देणार आहे. तसेच गोव्यातील पारंपरिक मासळी व्यावसायिकांना न्याय देण्यासाठीही लोकसभेत आवाज उठविणार आहे. अशा अनेक समस्‍या आहेत, ज्‍या वर्षानुवर्षे तशाच आहेत.

- कॅ. विरियातो फर्नांडिस, ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार

दक्षिण गोव्‍याचा श्‍‍वास असलेला दाबोळी विमानतळ बंद करण्याच्‍या मार्गावर केंद्र सरकार आहे. राज्य सरकारचा त्‍यास पाठिंबा आहे. हे सरकार विकासासाठी आणलेला पैसा इव्हेंटवर खर्च करत आहे. त्‍यामुळे आता जनताच या सरकारला चांगला धडा शिकविणार आहे.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

मोठ्या प्रमाणात होणार गुप्‍त मतदान : सरदेसाई

मुरगाव बंदरातील बॉक्साईट माल स्थानिक आमदार हुकूमशाहीच्या जोरावर संपविण्याचा कट रचतोय. तो माल बंद करून फक्त कोळसा हाताळणी करण्याचे षडयंत्र त्‍याने रचले आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

या सर्व गोष्‍टींचा विचार करून मतदारांनी मतदान करावे असे सांगून दक्षिण गोव्यात यावेळी मोठ्या प्रमाणात गुप्त मतदान होण्याची शक्यताही त्‍यांनी व्‍यक्त केली.

अमित पाटकर यांनी सांगितले की, देशसेवा बजावणारा खरा राष्ट्रभक्त असतो. याचे उदाहरण म्हणजे कॅ. विरियातो फर्नांडिस. राज्य सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा प्रदूषणाची काळजी वाहण्‍यासाठी मुरगावच्या आमदाराला नेमले आहे. तो फक्त पांढरे कपडे परिधान करून फिरत असतो. केवळ आश्‍‍वासने देऊन लोकांच्‍या तोंडाला पाने पुसणाऱ्या या सरकारला आता हद्दपार करणे गरजेचे आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तुमचे फोटो बनवा भन्नाट! विंटेज AI, Nano Banana ट्रेंड फॉलो करायचाय? येथे आहेत सर्व Prompt

Amarashilpi Jakanachari History: आश्चर्यकारक छिद्रातून सूर्यप्रकाश येतो, तो थेट मूर्तीवर पडतो; कैडलचा अमरशिल्पी जकनाचारी

Maratha History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे, ‘मराठा’ उपाधीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर गोव्यात बदल घडला

India vs Pakistan: ''टीम इंडियाला हलक्यात घेऊ नका, ते सहज हरवू शकतात", शोएब अख्तर घाबरला, पाकिस्तानला दिला 'हा' इशारा

Goa Crime: "कुत्र्यांना मारू नका" म्हटल्याने कॉन्स्टेबलची तरुणाला मारहाण, गुन्हा दाखल करण्यात पोलिसांची टाळाटाळ?

SCROLL FOR NEXT