South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

South Goa : गोळाबेरीज करून बांधला अंदाज; सात मतदारसंघांतून ७४ हजारांची आघाडी अपेक्षित

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa :

मडगाव, लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होऊन दोन दिवस उलटल्यानंतर काँग्रेस पक्ष किमान ७ हजार मताधिक्य घेऊन दक्षिण गोव्यातून जिंकेल, असा दावा काँग्रेसच्या काही विश्लेषकांनी केला आहे.

मागील जिल्हा पंचायत निवडणुकांतही सदर विश्लेषकांनी काँग्रेस संपूर्ण गोव्यात केवळ ५ जागा जिंकेल, असे त्यावेळचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना सांगितले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस केवळ दोन अंकी जागा जिंकेल, हे त्यांचे भाकीतही खरे ठरले होते.

७ मे रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकांत फोंडा तालुक्यातील फोंडा, मडकई व शिरोडा मतदारसंघात ३,५१५ तसेच मुरगाव तालुक्यातील मुरगाव, वास्को, दाबोळी व कुठ्ठाळी मतदारसंघात ६,९७५ अधिक मतदान झाले आहे.

२०१९च्या तुलनेत २०२४ मध्ये एकूण १०हजार मते या दोन तालुक्यात वाढली आहेत. त्याचबरोबर सासष्टी तालुक्यातील नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी व वेळ्ळी या आठ मतदारसंघातही १०,७६८ जास्त मतदान झाले आहे.

केपे, कुडचडे, सावर्डे व सांगे ह्या मतदारसंघात एकूण २०१९ च्या तुलनेत यंदा ८,५४९ मतदान जास्त झाले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

असा आहे कल

१ एकंदर मतदानाचा कल पाहता, फोंडा ते कुठ्ठाळी या सात मतदारसंघात भाजपला ३५ हजार मतांची आघाडी मिळू शकते. सासष्टीत मडगावात भाजप ८ हजार मतांची आघाडी घेईल. परंतु, सासष्टीतील उर्वरित सात मतदारसंघात कॉंग्रेसला ७४ हजारांची प्रचंड आघाडी मिळेल, असा विश्‍लेषकांचा अंदाज आहे.

२ केप्यात ४ हजार तर कुडचडे मतदारसंघात एक हजार मतांची आघाडी कॉंग्रेस घेईल, असा दावा सदर विश्लेषकांनी केला आहे. सावर्डे, सांगे आणि काणकोण मतदारसंघात भाजपला २९ हजारांचे मताधिक्य मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

SCROLL FOR NEXT