Shripad Naik Asset Dainik Gomantak
गोवा

Shripad Naik Asset: 'उत्पन्नाचा स्रोत व्यवसाय'; मंत्री श्रीपाद नाईक यांच्‍याकडे 14 कोटींची मालमत्ता

Shripad Naik Asset: गेली २५ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही श्रीपाद नाईक यांची मालमत्ता केवळ १३ कोटी ९३ लाख रुपयांची आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Shripad Naik Asset | Loksabha Election 2024

गेली २५ वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असूनही श्रीपाद नाईक यांची मालमत्ता केवळ १३ कोटी ९३ लाख रुपयांची आहे. तसे त्‍यांनी आज भरलेल्‍या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही की त्यांच्याविरोधात कोणताही खटला प्रलंबित नाही.

माझे शालेय शिक्षण कवळे येथील सरस्वती हायस्कूलमध्ये झाले आणि धेंपे विज्ञान व कला महाविद्यालयातून आपण १९७८ मध्ये कला शाखेची पदवी घेतल्याचे श्रीपाद यांनी नमूद केले. कोणताही सरकारी कर देय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आपल्या उत्पन्नाचा स्रोत हा व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर परतावा सादर करताना जाहीर केलेले उत्पन्न त्‍यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्यानुसार २०१८-१९ मध्ये ६ लाख ४३ हजार २६०, २०१९-२० मध्ये १२ लाख ४९ हजार ४३०, २०२०-२१ मध्ये ६ लाख ७३ हजार १३०, २०२१-२२ मध्ये ९ लाख २२ हजार ९१० रुपये तर २०२२-२३ मध्ये १७ लाख ६३ हजार २५० रुपये उत्पन्न होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले-

भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी उत्तर गोव्यात पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला आहे. प्रत्येक गाव आणि पंचायतीला त्यांनी भेटी दिल्या आहेत. तर, दक्षिण गोव्यातही पल्लवी धेंपे यांनी वीसही मतदारसंघांना भेटी दिल्‍या आहेत. आज अर्ज भरल्यानंतर त्यांचा आता प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झालाय. मतदारांनी भाजपच्‍या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावे.

हा विशाल नाईक कोण?

उत्तर गोव्यातून आज दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. भाजपचे श्रीपाद नाईक यांच्यासह ॲड. विशाल नाईक या युवा उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. त्यामुळे उत्तर गोव्यातून रिंगणात उतरणारा विशाल नाईक हा युवक कोण? याचा शोध नेटकरी दुपारनंतर घेत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

Goa Live News: विहिरीत पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

SCROLL FOR NEXT