Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत भाजपचा घरोघरी प्रचार, संकल्पपत्राचे वाटप

Bicholim News : आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) कार्यकर्त्यांनी व्होडप-बोर्डे तसेच भायली पेठ भागातील घरोघरी जाऊन श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला. संकल्प पत्राचेही वाटप केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली पालिका क्षेत्रात भाजपचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांचा घरोघरी प्रचार जोरात सुरु असून आजी-माजी आमदारांसह नगरसेवकही प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत.

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि माजी आमदार राजेश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) कार्यकर्त्यांनी व्होडप-बोर्डे तसेच भायली पेठ भागातील घरोघरी जाऊन श्रीपाद नाईक यांचा प्रचार केला. संकल्प पत्राचेही वाटप केले.

या प्रचारकार्यात उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक अनिकेत चणेकर, ऍड. रंजना वायंगणकर, दीपा शिरगावकर, माजी नगरसेवक कमलेश तेली यांच्यासह विश्वास गावस, समीर वायंगणकर आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भाऊंना प्रतिसाद

आतापर्यंत मिळून श्रीपाद नाईक हे पाचवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. प्रत्येकवेळी श्रीपाद नाईक यांना आघाडी मिळवून देताना त्यांच्या विजयात डिचोलीने मोठे योगदान दिले आहेत.

यावेळीही डिचोलीतून श्रीपाद नाईक यांना आघाडी मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून, प्रचारही जोरात सुरु केला आहे. यावेळी डिचोली मतदारसंघातून भाजप उमेदवाराला १५ हजारहून अधिक मतांची आघाडी मिळणार आहे, असा विश्वास आमदार डॉ. शेट्ये यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Ketu Gochar 2026: केतुने बदलली चाल अन् 3 राशींच्या नशीबाने घेतला 'यू-टर्न'! ऑफिसमधील कामाचे क्रेडिट चमच्यांना मिळणार; करिअरची गाडीही पंक्चर होणार

Usgao Water Issue: उसगावात दूषित पाणीपुरवठा, दोन दिवसांत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Goa Politics: आरजीपीच्या दुभंगण्याची कारणमीमांसा

VIDEO: 'चीअर्स'...! ट्रम्प साहेब, अमेरिकेत चहा आणि चीनमध्ये शॅम्पेन? जिनपिंगसोबतच्या शाही मेजवाणीतील व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर उलटसुलट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT