Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसचा प्रचार खर्चासाठी हात आखडता

Goa Congress : ‘पारंपरिक’ऐवजी डिजिटल माध्यमांवर भर

गोमन्तक डिजिटल टीम

अजय बुवा

Goa Congress :

सरकारी यंत्रणेने बॅंक खाती बंद केल्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या काँग्रेसने प्रचार खर्चासाठी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा भर पारंपरिकऐवजी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील प्रचारावर असेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील प्रचारासाठी जाहिरातीचे ३ हजार ५०० स्पॉट तयार करण्यात आले आहेत. याखेरीज वृत्तवाहिन्यांवर असलेल्या राजकीय दबावामुळे मुलाखतींसाठी आणि आपले म्हणणे मांडण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी युट्यूब चॅनेलना प्राधान्य द्यावे अशा सूचनाही पक्षातर्फे करण्यात आल्या आहेत.

आर्थिक कोंडीचा काँग्रेसच्या प्रचार मोहिमेवर परिणाम झाल्याची कबुली पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. कर्नाटक, तेलंगण आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.

हिमाचल प्रदेश वगळता आर्थिक रसद पुरवठ्यासाठी काँग्रेस पक्ष दक्षिणेतील दोन राज्यांवर अवलंबून आहे. प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला बजावलेली १७०० कोटी रुपयांची नोटीस आणि बॅंक खाती बंद राहिल्यामुळे पक्षाच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण काँग्रेसच्या एका नेत्याने नोंदविले.

प्रचारफलकांना कात्री

सत्ताधारी भाजपकडून केवळ ‘गुगल’ आणि ‘मेटा’ यासारख्या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. परंतु काँग्रेसला मर्यादित आर्थिक बळावर प्रचार करावा लागत असल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने प्रचार फलकांवरील जाहिराती प्रसिद्ध केलेल्या नाहीत.

जाहिरातींवरही परिणाम

काँग्रेसच्या एकूण प्रचार खर्चापैकी २५ टक्के खर्च वर्तमानपत्रांमधील जाहिरातींवर होत असे. यावेळी हा खर्च केवळ १५ टक्क्यांवर आला आहे. आतापर्यंत वर्तमानपत्रांना केवळ तीन जाहिराती दिल्या असून त्याही काही इंग्रजी आणि प्रादेशिक वर्तमानपत्रांनी छापलेल्या नाहीत. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांसाठी २५ सेकंदांचे ३५०० स्पॉट्स नोंदविण्यात आले आहेत. त्यातून पक्षाचा जाहीरनामा आणि धोरणांचा प्रचार केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT