Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : भाजपचे अर्ज मंगळवारी; काँग्रेसचा मुहूर्त अनिश्‍चित

Loksabha Election 2024 : अधिसूचना जारी करणार : आज अर्ज स्वीकारणे सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

पणजी, लोकसभेच्या उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघातील निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग उद्या (ता. १२) अधिसूचना जारी करणार आहे.

तसेच १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास पणजी आणि मडगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात सुरवात होईल. दोन्ही जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करत आहेत.

अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराला बॅंकेत खाते उघडावे लागणार आहे. प्रचाराचा सर्व खर्च त्या खात्यातूनच करावा लागणार आहे. आपल्याकडे किती रोख रक्कम आहे, याची माहितीही निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी लागेल.

शिवाय प्रचार खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे. त्यासाठी एका खुर्चीचे भाडे, चहाचा दर, मंडपाच्या आकारानुसार शुल्क, ध्वनी यंत्रणेचे भाडे

प्रतिज्ञापत्राकडे अनेकांचे लक्ष

भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि पल्लवी धेंपे या मंगळवारी उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित राहतील. उमेदवारांना अर्जासोबत मालमत्ता तसेच दायित्वाचे तपशील प्रतिज्ञापत्राच्या रूपात द्यावे लागणार आहेत.

माणिकराव राहणार उपस्‍थित

काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांचे अर्ज पुढील आठवड्यात भरले जातील. मात्र, अद्याप दिवस आणि वेळ निश्‍चित केलेली नाही. सोमवारी किंवा मंगळवारी अर्ज सादर होतील. यावेळी काँग्रेसचा कोणताही मोठा नेता उपस्थित नसेल. मात्र, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

फ्रान्सिस सार्दिनचे असहकारास्त्र

उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेस खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी या निवडणुकीत असहकारास्त्र हाती घेतले आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे मतदान करा, असे त्यांनी समर्थक कार्यकर्त्यांना सांगितल्याची माहिती हाती आली आहे. यामुळे सार्दिन यांनी कार्यकर्त्यांना मोकाट रान सोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी ''गोमन्तक''शी बोलताना, यावेळी मी प्रचारात भाग घेणार नाही. मी यावेळी फक्त आराम करणार, अशी प्रतिक्रिया सार्दिन यांनी व्यक्त केली होती. तुमच्या कार्यकर्त्यांचे काय असे विचारले असता, मी कुणालाही मला मते मारा, असे सांगू शकतो. दुसऱ्याला मत मार म्हणून सांगितले तर ते कसे ऐकतील, असा उलट सवालही त्यांनी केला होता.

नवमतदारांना संधी :

गेल्या आठवडाभरात मतदार यादीत नाव समाविष्ट कऱण्यासाठी अर्ज केलेल्या नवमतदारांनाही यंदा मतदान करण्याची संधी मिळणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने नाव समाविष्ट कऱण्यासाठीचा अर्ज मिळताच स्थानिक मतदार अधिकाऱ्याला तत्काळ अर्जदाराच्या पत्त्यावर खातरजमा करण्यासाठी पाठवण्यात येत आहे. अशा नवमतदारांना ओळखपत्रे दोन दिवसांत टपालाने मिळावीत, यासाठी यंत्रणा गतिमान कऱण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाकिस्तान जिंदाबाद फलक प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून सक्त करावाईचे आदेश, अवैध मद्य तस्करीबाबतही इशारा

कोहली म्हणाला, ''रुको, मार्कर लेके आता हूँ!'' 4 तास घराबाहेर बसलेल्या चाहत्यासाठी स्वतः धावला; किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल, 'हाच खरा किंग'

Mhaje Ghar: 'हे सरकारचे ऐतिहासिक पाऊल'! विश्‍वजीत राणेंचे प्रतिपादन; वाळपईत ‘माझे घर’ योजनेचे अर्ज वाटप

Goa Today's News Live: पाकिस्तान जिंदाबादचा फलक लावणाऱ्याविरोधात कडक कारवाई करणार; मुख्यमंत्री सावंत

मनोज परबांपेक्षा आमचं गोव्यावर अधिक प्रेम, घाटी – घाटी करुनच त्यांचा आमदार निवडून आला; मेटींचा पलटवार

SCROLL FOR NEXT