वास्को मोरगाव पत्रकार लेखक संघात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त उपस्थित नगराध्यक्ष दामोदर कासकर, सुदेश भोसले व इतर Dainik Gomantak
गोवा

Goa: लोकमान्य टिळकांची 101 वी पुण्यतिथी मुरगावात उत्साहात साजरी

दैनिक गोमन्तक

दाबोळी - ब्रिटीश सरकार विरोधात भारतीयांना एकत्रित आणण्यात महत्त्वाचा वाटा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना (Bal Gangadhar Tilak) प्राप्त होतो. टिळकांनी, सार्वजनिक गणेशोत्सव, सर्वापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतल्यामुळे आज भारत देश शैक्षणिक सामाजिक (Educational social) क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे प्रतिपादन मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी केले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची 101 वी पुण्यतिथी वास्को येथील मुरगाव (murgao) पत्रकार लेखक संघातर्फे, प्रमुख पाहुणे मुरगाव नगरपालीकेचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत सन्माननीय पाहुणे मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, संगेश केंक्रे, मुरगांव मोटरसायकल पायलट संघटनेचे अध्यक्ष उल्हास ( बाबु) आसोलकर, पत्रकार संघाचे खजिनदार मिलिंद काकोडकर, सहखजिनदार चंद्रशेखर, प्रदीप नाईक, अनंत मांद्रेकर, रुबीना खान व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना नगराध्यक्ष कासकर म्हणाले की टिळकांनी मराठा, केसरी सारखे वर्तमानपत्र सुरू करून ब्रिटिशांविरुद्ध एका प्रकारे स्वतंत्र्याची चळवळ सुरू केली होती. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली होती. त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज भारत देश विकासाच्या मार्गाने जात असल्याची माहिती नगराध्यक्ष कासकर यांनी दिली.

सन्माननीय पाहुणे नगरसेवक सुदेश भोसले म्हणाले की लोकमान्य टिळकांनी पत्रकारिते बरोबर समाज कार्याला सुद्धा महत्त्व दिले आहे. आजच्या युवकांनी टिळकांच्या पत्रकारितेचे ज्ञान व विचार घ्यायला पाहिजे. टिळका सारखी निर्भीड पत्रकारितेची आजच्या युगात खरी गरज असल्याची माहिती शेवटी नगरसेवक भोसले यांनी दिली. कार्यक्रमात सर्वांचे स्वागत व सूत्रसंचालन मिलिंद काकोडकर तर आभार प्रदर्शन सहसचिव सुभाष राव यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT