Casino Conins 
गोवा

बंगळुरु पालिकेचा अधिकारी गोव्यातील कॅसिनोचा सदस्य, लोकायुक्तांच्या रेडमध्ये घरात सापडले 583 Casino Coins

Lokayukta Raids: आत्तापर्यंत कारवाई केलेल्या 11 सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मगी यांचाही समावेश होता.

Pramod Yadav

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्त पोलिस कर्नाटकात छापेमारी करत आहेत. यामध्ये बंगळुरु महानगरपालिकेच्या महसूल निरीक्षक बसवराज मगी यांच्या घरी 583 कॅसिनो कॉईन्स सापडले आहेत.

केंगेरी विभागाच्या या निरीक्षकाच्या कलबुर्गी निवासस्थानी गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. कॅसिनो नाण्यांचे आर्थिक मूल्य अद्याप निश्चित झालेले नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात लोकायुक्त पोलिसांनी राज्यभरात छापे सुरु केलीय. आत्तापर्यंत कारवाई केलेल्या 11 सरकारी अधिकाऱ्यांमध्ये (एका निवृत्त व्यक्तीसह) मगी यांचाही समावेश होता.

मगी गोव्यातील पणजी येथील कॅसिनोचा सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी मगीशी संबंधित 11 ठिकाणी छापे टाकल्याची माहिती लोकायुक्तांनी दिलेल्या प्रेस नोटमध्ये दिली आहे.

मगीकडे 15 जागा, दोन निवासी घरे, 32 एकर शेतजमीन आणि 59 लाख रुपये रोख आहेत. मगीची एकूण संपत्ती 3.3 कोटी किंमतीची आहे.

छापा टाकलेल्या अधिकाऱ्यांच्या बेहिशोबी मालमत्तेचे प्रमाण लोकायुक्त पोलिसांना अद्याप लागलेले नाही, अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Griha Aadhar Scheme: विधानसभा निवडणुकीपूर्वीच 'गृहआधार' मानधनात होणार वाढ, डिचाेलीतील नारी शक्ती महोत्सवात CM प्रमोद सावंतांची घोषणा

Horoscope: रविवारचे राशीभविष्य: सूर्यदेवाच्या कृपेने 'या' 3 भाग्यशाली राशींना मिळणार आनंदाची बातमी, धनलाभासह प्रगतीचे योग

विकासाच्या हव्यासात निसर्गाचा श्वास गुदमरतोय!

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

SCROLL FOR NEXT