Lok Sabha Election
Lok Sabha Election  Dainik Gomantak
गोवा

दक्षिण गोव्यात लोकसभा ‘निवडणुकीचे वेध’; काँग्रेस गोंधळात

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा : लोकसभा निवडणूक अद्यापही पावणे दोन वर्षे दूर असली तरी भाजपने आत्तापासूनच कंबर कसली आहे. त्यांची प्रत्येक सभा, बैठकही लोकसभा निवडणूक जिंकण्याकरिता आयोजित

केल्याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी फोंडा येथे झालेल्या गरीब कल्याण योजनेबाबत आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत आला.

भाजपच्या या बैठकीला गर्दी ही चांगली असल्यामुळे भाजपचा रथ योग्य दिशेने जात आहे असेच वाटायला लागले आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या भाजपच्या प्रत्येक बैठकीत मोदी सरकारने गेली आठ वर्षे केलेली कामगिरी अधोरेखित करण्‍यात येत आहे. हीही लोकसभा निवडणुकीची तयारीची नांदी समजली जाते.

गोव्यात फोंडा तालुक्यातील तीन मतदारसंघ येत असून हे तीनही मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असल्यामुळे भाजपला येथे आघाडी मिळण्याची संभावना आहे.

इतर मतदारसंघाबाबत सांगायचे तर केपे, सांगे, काणकोण, सावर्डे कुडचडे, दाबोळी, वास्को या मतदारसंघात भाजप झेंडा फडकवू शकतो कुठ्ठाळीचे आमदार आंतोनिया वाझ हेही भाजपबरोबर असल्यामुळे तेथेही भाजप चमत्कार घडवू शकतो.

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस सध्या गोंधळात सापडली आहे. त्यांची अवस्था ‘कोणी कोणाचा नाही राजा’ अशी झाली आहे. दिगंबर कामतसह कॉग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशी हवा असल्यामुळे कॉंग्रेसचे कार्यकर्ते द्विधा मनःस्थितीत सापडलेले दिसतात.

परवा झालेल्या कॉंग्रेसच्या आंदोलनालाही अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे कॉंग्रेसची स्थिती बिकट झाल्याचे दिसते. परत आप व तृणमूलने उमेदवार रिंगणात उतरविल्यास कॉंग्रेसची अवस्था ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी होऊ शकते.

आप व तृणमूलने जरी भाजपसारखी तयारी सुरू केली नसली तरी ते आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. भाजपची मात्र दक्षिण गोव्यात सध्या ‘इंच इंच लढवू’ अशी स्थिती दिसत आहे.

बाबूंचे केले समाधान!

दक्षिण गोवा हा भाजपचा बालकिल्ला अजूनपर्यंत ठरलेला नाही. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. भाजपची उमेदवारी माजी खासदार नरेंद्र सावईकर यांना मिळणार हे जवळजवळ निश्चित झाल्याचे कळते. मध्यंतरी माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे नाव ऐकू येत होते. पण, त्यांना राज्याचे प्रदेश उपाध्यक्षपद देऊन भाजपने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

सुदिनचीही साथ मिळेल : मडकईत जरी मगोपचे ‘सुदिन’ वर्चस्व असले तरी सुदिन ढवळीकर सरकारात मंत्री असल्यामुळे तिथेही भाजप बाजी मारू शकतो.

सासष्ठीत जरी भाजप पिछाडीवर वाटत असला तरी नावेलीत भाजपचे उल्हास तुयेकर निवडून आल्यामुळे तसेच कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे भाजपबरोबर असल्यामुळे यावेळी सासष्ठीतही भाजप बऱ्यापैकी मते मिळवू शकतात.

फ्रान्सिस सार्दिनना उमेदवारी मिळेल?

कॉंग्रेसतर्फे सध्या विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन हे सक्रिय झाले असले तरी त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर आहे. कुठ्ठाळीचे कॉंग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांना कॉग्रेसची उमेदवारी मिळू शकते, अशी चिन्हे दिसताहेत.

पण कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सध्या पक्षात असलेला गोंधळ शमेल असे वाटत नाही. कारण एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरा विरोधी बाजूला जाऊ शकतो वा बंड करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT