Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress : काँग्रेसच्‍या उमेदवाराचा चावडी बाजारात प्रचार

Goa Congress : यावेळी त्यांच्यासोबत केपेचे आमदार व ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख एल्टन डिकॉस्‍टा, काँग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, कॉग्रेस काणकोण गटाध्यक्ष आबेल बोर्जीस, अन्य नेते व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress :

काणकोण, काँग्रेसचे दक्षिण गोव्‍यातील उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज गुरुवारी चावडी बाजारातील विक्रेत्‍यांची भेट घेऊन आपल्‍याला मतदान करण्‍याचे आवाहन केले.

यावेळी त्यांच्यासोबत केपेचे आमदार व ‘इंडिया’ आघाडीचे दक्षिण गोवा प्रचार प्रमुख एल्टन डिकॉस्‍टा, काँग्रेसचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, कॉग्रेस काणकोण गटाध्यक्ष आबेल बोर्जीस, अन्य नेते व कार्यकर्ते उपस्‍थित होते.

आजच्या प्रचार मोहिमेत काँग्रेसचे युवा नेते जनार्दन भंडारी यांची उपस्थिती नव्हती. त्याबाबत विचारले असता त्‍यांनी सांगितले की, काँग्रेसने माझ्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले.

यापूर्वी विधानसभा, लोकसभा निवडणुकीवेळी काणकोणातील नेतृत्व मी व माझी टीम करीत होती. मात्र आता आम्‍हाला अंधारात ठेवण्यात आले आहे. तरीसुद्धा मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे शक्य असेल त्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवाराला सहकार्य करेन.

काणकोणमधील हा दौरा रात्री उशिरा ठरला. त्यामुळे जनार्दन भंडारी आजच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र त्यांचा पूर्ण पाठिंबा ‘इंडिया’ आघाडीच्‍या उमेदवाराला आहे.

- कॅ. विरियातो फर्नांडिस, काँग्रेसचे उमेदवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शूटिंगनंतर कुठे गायब झालाय अक्षय खन्ना? 167 कोटींची मालमत्ता असलेला 'रहमान' राहतोय अलिबागमध्ये; स्वर्गाहून सुंदर फार्महाऊस!

Goa Fire: थिवीत 'अग्निकांड', शॉर्ट सर्किटमुळे घराला आग; 5 लाखांचे नुकसान!

Salt Lake Stadium: ममता बॅनर्जींनी मागितली मेस्सीची माफी; मैदानावर घडलेल्या घटनेबाबत व्यक्त केली नाराजी, चौकशी समिती स्थापनेचे आदेश

Goa Nightclub Fire: 'रोमिओ लेन' क्लबचे 18 महिने बेकायदेशीर ऑपरेशन; दिड वर्ष कोणाचेही लक्ष नव्हते?

Goa Live Updates: वागातोर येथील 'CO2 क्लब' सील

SCROLL FOR NEXT