Disaster Management Dainik Gomantak
गोवा

Disaster Management: आपत्तीत तात्काळ मदतीसाठी स्थानिकांना प्रशिक्षण मिळणार!

अशा उपक्रमांमुळे लोकांचे जीव वाचण्याबरोबर वित्तहानीही टाळली जाऊ शकते

गोमन्तक डिजिटल टीम

Disaster Management राज्यात आपत्ती कोसळलीच तर राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे जवान पोहोचण्यास वेळ लागतो.

अशा स्थितीत तत्काळ उपाययोजनांची स्थिती निर्माण झाल्यास त्यांना ती सेवा मिळावी, यासाठी स्थानिक जनतेला या मदतकार्यात सामावून घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याचा विचार केंद्रीय पातळीवर सुरू झाला आहे.

आपत्ती व्यवस्थापनावर केंद्र सरकारच्या वतीने आयोजित दोन दिवसीय परिषद पार पडली. महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक आणि अभियंता असे तिघे दिल्लीला जाऊन आले.

त्याठिकाणच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेत महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून तिघांनी हजेरी लावली. विज्ञान भवनाच्या सभागृहातील मार्गदर्शनास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार आहेत.

यामध्ये आपत्ती व्यवस्थापनात अनेकवेळा एनडीआरएफच्या जवानांची वाट पाहिली जाते. त्यात बराच वेळ जातो. त्‍यामुळे स्थानिक लोकांना आपत्ती व्यवस्थापनात काय करायचे? मदत कशी पोहोचवायची, लोकांना कसे वाचवायचे, अशा बाबी शिकविल्या जाणार आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात अनेकांना तत्काळ मदत मिळेल.

लोकांचे जीव वाचण्याबरोबर वित्तहानीही टाळली जाऊ शकते. अशा उपक्रमांमुळे आपत्ती काळात सरकारी यंत्रणेला स्थानिकांना सामावून घेता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: हडफडे आग दुर्घटना: 'प्लास्टिक सर्जरी' विभागात दाखल 3 रुग्णांची प्रकृती स्थिर; आठवडाभरात मिळणार डिस्चार्ज

Omkar Elephant: केळी, कवाथ्यांची नासधूस! सुपाऱ्यांच्या झाडांचेही नुकसान; ओंकार हत्तीमुळे शेतकरी हैराण Watch Video

Goa Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेबाबत वेगळेच कनेक्शन समोर! युवकाचा झाला होता बुडून मृत्यू; भुताटकी असल्याचा काहींचा दावा

Video: उद्धवस्त छत, जळून खाक झालेलं साहित्य; 25 जणांचा बळी घेणाऱ्या गोव्यातील नाईटक्लबचा व्हिडिओ समोर Watch

Goa Politics: खरी कुजबुज; मग राजकारण्‍यांवर कारवाई का नाही?

SCROLL FOR NEXT