Aleixo Sequeira Goemkarponn
गोवा

Verna Waste Plant: बैठकीसाठी स्थानिक लोक इच्छुक, मंत्र्यांचे मत मात्र वेगळे; वेर्णा कचरा प्रकल्पाचा घोळ

Verna Waste Project: स्थानिकांच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेल्या आहेत त्यामुळे वेगळी बैठक घेण्याची गरज नसल्याचे मंत्री सिक्वेरा यांचे मत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: वेर्णा औद्योगिक पठारावरील संभाव्य कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होत आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाबद्दल कित्येकदा आवाज उठविला आहे. यासंदर्भात स्थानिक लोक पर्यावरणमंत्री व नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्याशी बैठकीसाठी इच्छुक असले तरी स्वत: मंत्री या बैठकीला राजी नाहीत.

कचरा प्रकल्पाबद्दलच्या स्थानिकांच्या भावना आपल्याला कळलेल्या आहेत व या भावना आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. त्यामुळे त्यासाठी वेगळी बैठक घेण्याची गरज भासत नसल्याचे मंत्री सिक्वेरा यांचे मत आहे.

स्थानिक मात्र मंत्र्यांच्या या भूमिकेबद्दल नाराज आहेत. आम्ही त्यांना आमच्या समस्या लेखी देणार होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, मंत्री सांगतात की, आपल्याला या प्रकल्पाबद्दल समस्या माहीत आहेत. याबद्दल आपण विधानसभेतही बोललो आहे.

जेव्हा स्थानिक लोक संबंधित मंत्र्याला भेटण्यासाठी सचिवालयात आले होते तेव्हा मी माझ्या केबिनमध्ये होतो. तेव्हा ते आपल्याला का भेटले नाहीत, असा दावा मंत्री सिक्वेरा करतात.

आपण घरी किंवा दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कचेरीत उपलब्ध असतो. जर त्यांना आपल्याला भेटायचे असेल तर त्यांनी यापैकी कुठल्याही एका ठिकाणी यावे. वेर्णा पठारावरील संभाव्य कचरा प्रक्रिया प्रकल्पाबद्दल आपल्या काय भावना आहेत त्या आपण योग्यवेळी जाहीर करू, असेही मंत्री सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers: लुथरा बंधूंची पोलिस कोठडी संपुष्टात! कोर्टात करणार हजर; चौकशी समितीच्या अहवाल होणार सादर

Goa ZP Election: जिल्‍हा पंचायती भाजपकडे की विरोधक मारणार बाजी? जनतेचा कल होणार स्पष्ट; मंत्री, आमदारांच्‍या भवितव्‍याचाही फैसला

Horoscope: नव्या सप्ताहाची दमदार सुरुवात! 'या' राशींना मिळणार करिअरमध्ये मोठी संधी, वाचा भविष्य

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT