Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport Liquor Shop: ‘मोपा’वरील मद्यविक्रीस स्थानिकांचा विरोध; मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स कंपनीची गोवा खंडपीठात याचिका

Mopa Airport: मोपा विमानतळावर स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधामुळे मद्यदालन सुरू करण्यास शक्य झाले नसल्याची याचिका मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स प्रा. लि. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport Liquor Shop Mumbai Wines and Trades Private Limited

पणजी: मोपा विमानतळावर स्थानिकांकडून होत असलेल्या विरोधामुळे मद्यदालन सुरू करण्यास शक्य झाले नसल्याची याचिका मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स प्रा. लि. कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे.

विमानतळाच्या टर्मिनल इमारतीत मद्यदालन सुरू करण्यास भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) निविदेद्वारे घेतलेल्या लिलावात यशस्वी ठरवले आहे. याबाबत खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली असून, त्यावरील सुनावणी ११ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

गोवा सरकारने या इमारतीच्या टर्मिनलमध्ये मद्यदालन सुरू करण्यास ‘एएआय’ला परवानगी दिली होती. त्यानुसार या दालनासाठी ऑनलाईन निविदा जारी केली होती व त्यावर लिलाव झाला होता. या लिलावात मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स कंपनी यशस्वी ठरली होती. या दरम्यान राज्यातील मद्य व्यवसाय मालक संघटनेने याचा जाब सरकारला विचारला होता, मात्र सरकारने त्याला काहीच उत्तर दिले नव्हते. संघटनेने विमानतळावर मद्यदालन सुरू करण्यास विरोध केल्याने यशस्वी निविदाधारक कंपनीला अडचणी येत आहे.

कंपनीने हा व्यवसाय सुरू करण्यासाठी दालन उभारण्याचे काम सुरू केल्यास विरोध होण्याची शक्यता आहे. एएआयने या मद्यदालनाला कोणतीही हरकत घेतलेली नाही व त्यासंदर्भातचे स्पष्टीकरण २१ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे मद्य दालन उभारण्याच्या कामावेळी सरकारला सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. सरकारला एका आठवड्यात या याचिकेत उत्तर देण्यास खंडपीठाने निर्देश दिले आहेत.

संरक्षणाची मागणी

एएआयने या दालनासाठी ऑनलाईन निविदा जारी केली होती व त्यानंतर आलेल्या अर्जदारांमध्ये लिलाव केला होता. या लिलावामध्ये मुंबई वाईन्स अँड ट्रेड्स कंपनी यशस्वी ठरली होती. हे दालन उभारल्यास तेथे स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता असल्याने हा व्यवसाय सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे कंपनीला मद्यदालन उभारताना संरक्षण देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, यासंदर्भातची विनंती याचिकेत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT