Curtorim Lake Dainik Gomantak
गोवा

Curtorim Lake : कुडतरीतील तळ्‍यांना वारसास्‍थळे घोषित करण्‍यास स्थानिकांचा विरोध

Curtorim Lake : १६ रोजी बैठक : पर्यावरणमंत्री सिक्‍वेरा राहणार उपस्‍थित

गोमन्तक डिजिटल टीम

Curtorim Lake : मडगाव, कुडतरीतील दोन तळ्‍यांना जैव विविधता वारसास्‍थळे म्‍हणून घोषित करण्‍याचे राज्‍य जैवविविधता मंडळाने ठरविले आहे. मात्र, बफरझोन क्षेत्रावरून स्‍थानिकांमध्‍ये साशंकता असल्‍याने त्‍यांनी या प्रस्‍तावाला विरोध केला आहे.

स्‍थानिकांच्‍या शंका दूर करण्‍यासाठी आता १६ जानेवारी रोजी बैठक घेण्‍याचे ठरविले असून कुडतरी पंचायतीच्‍या सभागृहात ही बैठक होणार आहे.

कुडतरीतील स्‍थानिक शेतकऱ्यांनी काल पर्यावरण मंत्री आलेक्‍स सिक्‍वेरा यांची भेट घेऊन गावातील लोकांशी यासंंबंधी चर्चा करण्‍यात यावी, अशी मागणी केली.

यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लाॅरेन्‍स आणि जैवविविधता मंडळाचे सदस्‍य सचिव प्रदीप सरमाेकादम हेही उपस्‍थित होते. यावेळी मंत्री सिक्‍वेरा यांनी स्‍थानिकांबरोबर बैठक घेण्‍याचे मान्‍य केले. या बैठकीला ते स्‍वत: उपस्‍थित रहाणार असल्‍याचे सांगितले.

स्थानिकांत निर्बंधांची भीती !

कुडतरीमधील तळी वारसास्‍थळे म्‍हणून जाहीर करण्‍याची प्रक्रिया २०१५ पासून सुरू झाली होती. या तळ्‍यांना हा दर्जा देण्‍यास लोकांचा विरोध नाही, मात्र या तळ्‍यांना हा दर्जा मिळाल्‍यावर जे बफरझोन क्षेत्र आहे, त्‍यात लोकांवर निर्बंध येऊ शकतील, अशी भीती स्‍थानिकांमध्‍ये आहे.

त्‍यामुळे त्‍यांचे समाधान करण्‍यासाठी ही बैठक बोलाविण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे,अशी माहिती स्‍थानिक जैवविविधता समितीचे अध्‍यक्ष सांतान रॉड्रीगीस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT