Locals irked by the persistent breakdown of Camurlim -Tuem ferry Dainik Gomantak
गोवा

प्रवाशांची गैरसोय, प्रकरण निकाली काढण्याचं आरोलकरांच आश्वासन

दैनिक गोमन्तक

कामुर्ली-तुये फेरीने प्रवास करणाऱ्या स्थानिकांनी फेरीच्या मध्यभागी सतत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार केली आहे. गंमत म्हणजे, नुकतीच नवीन फेरी बदलण्यात आली आहे. लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्या तरी या तक्रारी फोल ठरल्या आहेत. आमदार जीत आरोलकर (Jit Arolkar) यांनी हे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, पेडणे तसेच बार्देश या दोन्ही तालुक्यांना जवळच्या अंतराने जोडणाऱ्या तसेच शापोरा नदीमार्गे प्रवासी वाहतूक करणाऱ्या कामुर्ली-तुयें जलमार्गावरील विशेष फेरीबोट सेवेचे शुल्क डोईजड होत असल्याने त्यात कपात करण्याची जोरदार मागणी दोन्ही तालुक्यांतील लोकांकडून करण्यात येत आहे.

संबंधित खात्याकडून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी पेडणे (Pernem) तसेच बार्देश तालुक्यातील प्रवाशांकडून होत आहे. या भागातील विशेष फेरीबोट सेवेसाठी पूर्वीचा दर शंभर रुपये इतका होता; मात्र, नदी परिवहन खात्याकडून सध्या त्या दरात वाढ करून ती रक्कम दोनशे पन्नास इतकी वाढविण्यात आल्याने सामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फरफट होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT