Mandur Dangerous Wall Dainik Gomantak
गोवा

Mandur News: मंडूर परिसरातील धोकादायक घरे, कुंपणे हटविण्याची मागणी

Mandur Panchayat: परिसरातील जीर्ण किंवा कमकुवत झालेल्या वास्तू ओळखून जीवितहानी होणार नाही याची खात्री पंचायतीने केली पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: मंडूर येथे हल्लीच घराची भिंत कोसळून आई-मुलाचा मृत्यू झाला होता. आजोशी-मंडूर परिसरात अनेक ठिकाणी जीर्ण झालेली घरे आणि कुंपणे आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक घरे, कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही धोकादायक घरे हटविण्याची स्थानिकांची मागणी आहे.

आजोशी परिसरात रस्त्याच्या बाजूला एका घराची भिंत कोसळून माती आणि दगड रस्त्यावर आले असून संपूर्ण घर कोसळल्यास वाहतुकीवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण घर रस्त्याच्या बाजूला आहे. जुने गोवा-पिलार मुख्य जिल्हा रस्ता असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. आजोशी येथे एका जुन्या घराचे कुंपण पूर्णता जीर्ण अवस्थेत आहे, त्याचा काही भाग कोसळला होता, इतर ठिकाणी देखील भेगा गेल्याने ते कधीही हे कुंपण कोसळण्याची शक्यता आहे.

परिसरातील जीर्ण किंवा कमकुवत झालेल्या वास्तू ओळखून जीवितहानी होणार नाही, याची खात्री पंचायतीने केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

धाकादायक आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या वास्तू ओळखण्याचे काम अजून हाती घेतलेले नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जीर्ण स्थितीतील घरे आणि कुंपण मालकांना आम्ही लवकरच नोटीस बजावणार आहोत.
प्रशांत नाईक, सरपंच, मंडूर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

Goa Fisheries Projects Pending: गोव्याच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राला निधीचा फटका! 53 कोटी मिळाले; पण 6 वर्षांत अवघे 47 कोटीखर्च, केंद्रीयमंत्र्यांचा संसदेत खुलासा

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

SCROLL FOR NEXT