Cuncolim Locals Dainik Gomantak
गोवा

Cuncolim Industrial Estate: मासळीची वाहने पुन्हा अडवली, असह्य दुर्गंधीने कुंकळ्ळीवासीय हैराण; पोलिसांकडून तपासणी

Police Investigation Fish Transport : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या मासळी प्रक्रिया कारखान्यासाठी मासळी घेऊन येणाऱ्या वाहनातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे कुंकळ्ळीवासीय हैराण झाले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Cuncolim News: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत असलेल्या मासळी प्रक्रिया कारखान्यासाठी मासळी घेऊन येणाऱ्या वाहनातून येणाऱ्या असह्य दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या कुंकळ्ळीवासीयांना काल (16 ऑक्टोबर) रात्री पुन्हा हाच प्रत्यय आल्याने लोकांनी पोलिसांना पाचारण करून ही वाहने अडविली.

यापूर्वीही लोकांनी कित्येक वेळा ही मासळीची वाहने अडवली होती. काल रात्री एकाच बरोबर सात मासळीची वाहने रस्त्यावरून जात असताना त्यातून असह्य अशी दुर्गंधी वातावरणात पसरल्याने लोक रस्त्यावर आले. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोक रस्त्यावर उतरले होते. पहाटे अडीच वाजेपर्यंत लोक रस्त्यावर ठाण मांडून होते.

कुंकळ्ळी येथील एक आंदोलक अविराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री ही दुर्गंधी पसरविणारी वाहने रस्त्यावर धावू लागल्याने हैराण झालेल्या लोकांनी व्हॉट्सॲप वरून एकमेकांना संदेश पाठविण्यास सुरुवात केली. त्यांनतर लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावले.

तीन वाहनातून दुर्गंधी

पोलिसांनी सुमारे पाच वाहने अडवून तपासणी केली असता त्यातील तीन वाहनातून दुर्गंधी येत असल्याचे आढळून आले. अखेर लोक रस्त्यावर आल्याचे तसेच पोलिस वाहनांवर कारवाई करत समजताच मासळी घेऊन जाणारी वाहने वसाहतीतून बाहेर पाठविण्याचे उद्योजकांनीच स्वतःहून बंद केले, अशी माहिती अविराज देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT