Taxi Dainik Gomantak
गोवा

Taxi Operators: टॅक्सी व्यावसायिकांबाबतीत सरकारचा इरादा काय आहे? सतत तपासणी, सतावणुकीमुळे चालक हैराण

Goa Taxi Drivers Problem: सरकार टॅक्सी व्यवसायिकांना अडचणी का निर्माण करीत आहे? सरकारने दिशाभूल न करता, इरादा स्पष्ट करावा, अशी मागणी व्यावसायिक हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.

Sameer Panditrao

Local Taxi Drivers Mopa

हरमल: स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मोपा विमानतळवर प्रवासी जाणे सध्या कठीण झाले आहे. पावलोपावली पोलिस, वाहतूक पोलिस. फ्लाइंग स्क्वॉड आदींच्या सतावणुकीस सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाण्याबरोबरच टॅक्सी व्यावसायिकांचीही सतावणूक होत आहे. हा छळ थांबवा, अशी मागणी स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे.

किनारी भागातील सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांकडे आवश्यक परवाना व वैध कागदपत्रे असतात. तरीही वारंवार अडवून करून सरकार काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्‍न हे व्यावसायिक उपस्थित करीत आहेत.

या सतावणुकीमुळे टॅक्सी व्यावसायिक हैराण आहेत, असे टॅक्सी चालक अनंत नाईक यांनी सांगितले.सरकार टॅक्सी व्यवसायिकांना अडचणी का निर्माण करीत आहे? हा गंभीर प्रश्न असून सरकारचा इरादा काय आहे? सरकारने दिशाभूल न करता, इरादा स्पष्ट करावा, अशी मागणी व्यावसायिक हितेंद्र ठाकूर यांनी केली आहे.

प्रलंबित मागण्या पूर्ण करा

टॅक्सी व्यावसायिक ॲप आधारित टॅक्सी व्यवसाय करीत नसल्याचे कारण असल्यास, सरकारने मोपा विमानतळ तसेच लागू केलेले टॅक्सीचे दरपत्रक समान करावे, सबसिडी चालू करावी व प्रलंबित मागण्या सोडवाव्यात तसेच स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी खास योजना राबवावी, अशी मागणी टॅक्सी संघटनेच्या एका सदस्याने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

SCROLL FOR NEXT