Souza Lobo Restaurant Case: Goa police

 

Dainik Gomantak 

गोवा

‘सोझा लोबो’ रेस्टॉरंट हल्ला प्रकरणाला स्थानिक पोलिसांचा छुपा पाठिंबा..

पोलिसांना मिळतो दरमहा अडीच लाखांचा 'मलिदा’

दैनिक गोमन्तक

कळंगुट: येथील ‘सोझा लोबो’ रेस्टॉरंटवर (Souza Lobo Restaurant Case) झालेला भयावह हल्ला हा स्थानिक पोलिसांच्या छुप्या पाठबळावर दिल्लीस्थित हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात आला होता. तसेच संशयित गजेंद्र सिंग ऊर्फ छोटू व अन्य काहींकडून त्यांची कुकर्मे लपविण्यासाठी स्थानिक पोलिसांना दरमहा अडीच लाखांचा मलिदा

पुरवला जात होता, असा सनसनाटी आरोप ‘सोझा लोबो’चे मालक ज्यूड लोबो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे व देण्‍यात येत असलेल्‍या धमक्‍यांमुळे आम्ही वैतागलो असून 90 वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय बंद करून परदेशात स्थायिक होण्याचा विचार करत असल्याचेही त्‍यांनी सांगितले.

आपल्‍या रेस्टॉरंटवर (Souza Lobo Restaurant) झालेला हल्ल्‍याची ही तिसरी वेळ आहे. हा पूर्वनियोजित कट होता. त्‍यात कळंगुटच्‍या (calangute) निलंबित पोलिस निरीक्षकापासून एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याचे ज्यूड लोबो यांनी यावेळी सांगितले. हल्ल्यामागचा मास्टर माईंड दिल्लीस्थित हॉटेल व्यावसायिक अरोरा हाच असून, जोपर्यंत त्याच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत आपल्याला पूर्ण न्याय मिळणार नसल्याचे शेवटी लोबो म्‍हणाले.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात असलेल्‍या छोटू याचा अनेक गुन्हेगारी कृत्‍यांत सहभाग आहे. 2019 साली हणजूणमध्‍ये पंचसदस्य सुरेंद्र गोवेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्‍यानंतर त्‍याच्‍यावर पोलिसांनी कारवाई केली होती. एकेकाळी गोव्यात वेटरची नोकरी करणाऱ्या या छोटूचे आज हणजूण-वागातोरपासून कळंगुटपर्यत सात ते आठ डान्सबार आहेत. त्याच्‍या या अनधिकृत व्यवसायाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ज्यूड लोबो यांनी सांगितले.

या प्रकरणात निरीक्षक कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी असल्याने तसेच त्यांचे या प्रकरणात वैयक्तिक हेतू असल्याने त्वरित त्यांना सेवेतून निलंबित केले आहे. त्यांच्यासह कळंगुटचे आणखी दोन पोलिस कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव व समीर साखळकर निलंबित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT