Goa News |Mobile Tower Dainik Gomantak
गोवा

Goa News: मायणा शाळेजवळ मोबाईल टॉवर उभारण्यास स्थानिकांचा पुन्हा विरोध

मायणा-कुडतरी शाळेजवळ मोबाईल टॉवर उभारण्यास काल पुन्हा एकदा स्थानिकांनी विरोध करत हे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी पाठविले.

दैनिक गोमन्तक

Goa News: मायणा-कुडतरी शाळेजवळ मोबाईल टॉवर उभारण्यास काल पुन्हा एकदा स्थानिकांनी विरोध करत हे काम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी पाठविले. या टॉवरच्या बाबतीत स्थानिक आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

काल या टॉवरचे काम करण्यासाठी टेलिफोन कंपनीचे अधिकारी पोलिस फौजफाट्यासह उपस्थित होते. मात्र, स्थानिकांनी या कामाला जोरदार विरोध केल्याने त्यांना माघारी परतावे लागले.

यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य मोरेन रिबेलो म्हणाले, लोकांचा विरोध असतानाही किमान पाचवेळा या शाळेजवळ टॉवर उभारण्याचा प्रयत्न झाला असून आमदार लॉरेन्स यांनी आपण हे काम बंद करणार, असे आश्वासन लोकांना दिले होते. तरीही टॉवर उभारण्याचे प्रयत्न बंद झालेले नाहीत. हा टॉवर येथे उभा राहावा, यासाठी स्वतः आमदार दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकांची कामे व्हावीत यासाठी आपण भाजप सरकारला पाठिंबा दिल्याचे आमदार सांगतात. मात्र, येथे लोकांची कामेच होत नाहीत. जर त्यांना असा पाठिंबा देऊनही लोकांची कामे करता येत नसतील तर त्यांनी हा पाठिंबा मागे घेऊन लोकांसोबत राहावे, असे आवाहन मोरेन रिबेलो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT