cavelossim beach Dainik Gomantak
गोवा

खासगी बीचवरील कार्यक्रमामुळे केळशीवासीय आक्रमक

कार्यक्रमासाठी उभारलेल्या सेटअपमुळे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात पर्यटन हंगाम सुरु होताच पर्यटकांची गर्दी ठिकठिकाणी दिसू लागली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. मात्र हेच कार्यक्रम आता सर्वसामान्य गोवेकरांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. बीचवर होणाऱ्या संगीत रजनींमुळे स्थानिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

मडगाव (Madgaon) परिसरातील किनाऱ्यांवर पर्यटकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी विविध कार्यक्रमही आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जातं, ज्याचा त्रास स्थानिकांना होताना दिसत आहे. केळशी बीचमध्येही अशाचप्रकारे खासगी बीचवर (Beach) आयोजित केलेल्या कार्यक्रमाविरोधात आता स्थानिक आक्रमक झाले आहेत. मच्छिमारांनीही या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे.

केळशीतील खासगी बीचवर आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे मासेमारीला धोका निर्माण झाल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. तर स्थानिकांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उभारलेल्या सेटअपमुळे नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पंचायतीने मात्र या कार्यक्रमाला रितसर परवानगी घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच गोवा राज्य किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाची ना हरकत पाहिल्यानंतरच दिल्याचंही सांगितलं आहे. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना अटक (Arrest) करण्याचा इशारा दिल्यानंतर काहीकाळ वातावरण तापल्याचं चित्र होतं.

स्थानिकांना खासगी बीचवरील कार्यक्रमाच्या आयोजकांनी याप्रकरणी हस्तक्षेप न करण्याची तंबी दिली. यानंतर संतप्त स्थानिकांनी याप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बीचच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा स्थानिकांनी करत अशा प्रकारच्या कार्यक्रमांना तीव्र विरोध दर्शवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT