Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: क्राईम ब्रँचने लोबोंची चौकशी करावी

विजय भिके ः ‘ना खाऊंगा... ना खाने दुंगा’ फक्त घोषणाच

गोमन्तक डिजिटल टीम

‘ना खाऊंगा... ना खाने दुंगा’ ही भाजपा सरकारची फक्त निवडणुक काळातील घोषणा आहे. त्या उलट गोव्यातील भाजपा सरकारचा कारभार चालतो. सध्या गोव्यातील ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाने खंडणीचे प्रकरण गाजत असून सत्ताधारी आमदारही आरोप करीत आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिली.

मूळात आरोप करणारे भाजपाचेच नेते असून खंडणी प्रकरणाच्या मूळाशी जाण्यासाठी क्राईम ब्रँचने आमदार मायकल लोबोंची चौकशी करावी.

लोबोंकडून संबंधित खंडणीबहाद्दरांची नावे घ्यावीत, अशी मागणी विजय भिके यांनी शनिवारी म्हापशात पत्रकार परिषदेतून केली. यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर व राजेंद्र कोरगांवकर हे हजर होते.

नेते वैफल्यग्रस्त! : प्रोटेक्शन मनीच्या नावाने किनारी भागांतील हॉटेलवाल्यांकडे खंडणी मागण्यात आली, असे आरोप खुद्द भाजपा आमदारानेच केलेत. या हॉटेलवाल्यांना बोलावून दरबार भरविण्यात आला व तिथे संबंधितांकडून खंडणी मागण्यात आली.

सध्या गोव्यातील भाजपा सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून काही नेत्यांना आपला वाटा थेट मिळत नसल्याने सर्वजण वैफल्यग्रस्त बनलेत. त्यामुळे ते एकमेकांना बोट दाखवत फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT