Goa University LLB  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission Scam : ‘एलएलबी’ प्रवेशासाठी नव्याने मेरिट लिस्ट बनवा; विद्यापीठाची सूचना

सकृतदर्शनी प्राचार्य दोषी

दैनिक गोमन्तक

बीए-एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया पद्धतीत कारे कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साबा दा सिल्वा यांनी स्वतःहून बदल केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने बुधवारी त्यांना चौकशी समितीसमोर हजर राहण्‍याचा आदेश जारी करण्‍यात आला आहे.

दरम्यान, या नवीन प्रवेश पद्धतीमुळे कित्येक विद्यार्थ्यावर अन्याय झाल्यामुळे जुन्या प्रवेश पद्धतीनुसार नवीन मेरिट लिस्ट तयार करावे अशी सूचना गोवा विद्यापीठाने उच्च शिक्षण संचालनालयाला केली आहे.

या अभ्याक्रमासाठी कारे महाविद्यालयात ६० तर साळगावकर कायदा महाविद्यालयात १२० विद्यार्थ्याना प्रवेश देण्यात आला आहे. मात्र या नवीन आदेशामुळे आता या विद्यार्थ्याचे काय होणार हा पेचप्रसंग उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासाठी बारावीत पडलेल्या गुणांना अर्धे तर प्रवेश परीक्षेतील गुणांना अर्धे महत्त्‍व दिले जात होते. मात्र यावेळी प्रवेश देताना फक्त प्रवेश परीक्षेचे गुणच विचारात घेण्यात आले होते.

दा सिल्वा यांनी स्वतःच्या मर्जीने प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याचे चौकशी समितीच्या चौकशीत पुढे आले आहे. यामुळे त्‍यांच्‍यासह या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जबानीसाठी बुधवारी चौकशी समितीसमोर हजर राहण्याचा आदेश देण्‍यात आला आहे.

साळगावकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांची साक्षही समिती नोंदवून घेणार आहे. विद्यापीठाच्या डीन डॉ. सविता केरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करत आहे.

समितीच्‍या बैठकीत कागदपत्रांची छाननी

आज या समितीच्या सदस्यांची बैठक होऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कागदपत्रांची छाननी केली. ही पद्धती विद्यापीठाच्या परवानगीने बदलली गेली असा दावा प्राचार्य डॉ. दा सिल्वा करत असले तरी विद्यापीठाने या बदलाला संमती दिली नव्हती हे चौकशीत स्‍पष्‍ट झाले आहे.

आपल्या मुलाला या अभ्यासक्रमात प्रवेश मिळणे सुकर व्हावे यासाठी ही पद्धती दा सिल्वा यांनी बदलल्याचा आरोप यापूर्वी विद्यार्थ्यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT