LLB Admission  Dainik Gomantak
गोवा

LLB Admission : एलएलबी अभ्यासक्रमाची मेरिट लिस्ट अखेर तयार; १८० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

LLB Admission Merit List : यंदा बीएएलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश यादीची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात उच्च शिक्षण खात्याने अशीच दिरंगाई करीत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, प्रवेश परीक्षेचा निकाल ३ जुलै रोजी झालेला असतानाही एलएलबी पदवी अभ्यासक्रमाची शेवटची मेरिट लिस्ट २५ जुलैपर्यंत तयार न झाल्यामुळे दैनिक ‘गोमन्तक’ने उच्च शिक्षण खात्याला खडबडून जागे करण्याची भूमिका पार पाडल्यावर लगेच ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

यंदा बीएएलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश यादीची अंतिम मेरिट लिस्ट जाहीर करण्यात उच्च शिक्षण खात्याने अशीच दिरंगाई करीत विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लावला होता.

त्यावेळीही ‘गोमन्तक’नेच याकडे संबंधितांचे लक्ष वेधल्यावर अशीच यादी जाहीर केली होती. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांची पडताळणी करण्यास दिरंगाई केल्याने ही अंतिम मेरिट लिस्ट तयार करण्यास वेळ लागला, असा खुलासा उच्च शिक्षण खात्याने केला आहे.

यावेळी जाहीर केलेल्या अंतिम मेरिट लिस्टमध्ये कारे आणि साळगावकर कायदा महाविद्यालयांसाठी १८० विद्यार्थ्यांचा प्रवेश नक्की केला असून ७३ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले आहे. त्याशिवाय २१ विद्यार्थी असे आहेत, ज्यांनी पदवी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी उच्च शिक्षण खात्याला सादर केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT